महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर लॉकडाऊन इफेक्ट : रुग्णवाढीचा वेग मंदावला; दिवसभरात 65 नवे रुग्ण तर 241 जणांना डिस्चार्ज - कोल्हापूरात दिवसभरात 65 नवे रुग्ण

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने ७ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम दिसायला सुरूवात झाली असून रोज २०० च्या आसपास रुग्णांचे आकडे जात होते. आता ती संख्या रोडावली असून काल सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंत केवळ 65 नवे रुग्ण आढळले आहेत.

kolhapur-lockdown-effect
कोल्हापूर लॉकडाऊन इफेक्ट

By

Published : Jul 28, 2020, 3:38 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेल्या संख्येचा विचार करून प्रशासनाने गेल्या आठवड्यात 7 दिवसांचा लॉकडाऊन केला होता. त्याचे किंचित परिणाम झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. काल सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंत केवळ 65 नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून दररोजच 150 ते 200 रुग्ण आढळत होते. काही वेळा तर हा आकडा 300 पार सुद्धा गेला होता. मात्र आता रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत चालली आहे. काल दिवसभरात तब्बल 241 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

काल सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आढळलेल्या नवीन 65 रुग्णांनंतर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4621 इतकी झाली आहे तर त्यातील 1900 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 129 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2592 झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात आढळलेल्या 65 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मात्र एकट्या कोल्हापूरात शहरातील 47 इतके आहेत.

जिल्ह्यातील एकूण आकडेवारी एक नजर :

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 107

भुदरगड- 102

चंदगड- 344

गडहिंग्लज- 207

गगनबावडा- 9

हातकणंगले- 327

कागल- 81

करवीर- 520

पन्हाळा- 198

राधानगरी- 153

शाहूवाडी- 261

शिरोळ- 132

नगरपरिषद क्षेत्र- 1018

कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 1099

असे एकूण 4558 रुग्ण आढळले आहेत.

इतर जिल्हा व राज्यातील 63 असे मिळून एकूण 4621 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 4621 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1900 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 129 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या 2592 इतकी आहे.

वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

1 वर्षांपेक्षा लहान - 17 रुग्ण

1 ते 10 वर्ष - 256 रुग्ण

11 ते 20 वर्ष - 462 रुग्ण

21 ते 50 वर्ष - 2709 रुग्ण

51 ते 70 वर्ष - 994 रुग्ण

71 वर्षांपेक्षा जास्त - 183 रुग्ण

एकूण 129 मृत रुग्ण पुढीलप्रमाणे :

इचलकरंजी - 43 रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर शहर - 19 रुग्णांचा मृत्यू

हातकणंगले - 14 रुग्णांचा मृत्यू

गडहिंग्लज - 6 रुग्णांचा मृत्यू

करवीर - 14 रुग्णांचा मृत्यू

आजरा - 2 रुग्णांचा मृत्यू

शिरोळ - 4 जणांचा मृत्यू

जयसिंगपूर - 2 रुग्णांचा मृत्यू

शाहूवाडी - एका रुग्णाचा मृत्यू

पन्हाळा - 3 रुग्णांचा मृत्यू

चंदगड - 4 रुग्णांचा मृत्यू

भुदरगड - एका रुग्णाचा मृत्यू

हुपरी - 5 रुग्णांचा मृत्यू

कुरुंदवाड - एका रुग्णाचा मृत्यू

कागल - एका रुग्णाचा मृत्य

इतर जिल्हा आणि राज्यातील 7 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details