कोल्हापूर - वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. या यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. पण यंदा यात्रा रद्द करावी लागल्याने दरवर्षी भाविकांच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
भाविकांच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या जोतिबा मंदिर परिसरात यंदा शुकशुकाट - kolhapur corona
वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली.
jyotiba yatra
गुलालाची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं'चा जयघोष करत आकाशामध्ये मिरवणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दरवर्षी पाहतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच जोतिबा मंदिर सूनं पडल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी किती उत्साहात यात्रा पार पडली आणि यंदा यावर कसा परिणाम झाला पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून...