महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष : 'टिमकी शिवाय होळी नाही'; चामड्याच्या टिमकीची जागा घेतली प्लास्टिकने..

कोल्हापुरात होळी सणाला टिमकीचे खूप महत्व आहे. प्रत्येक गावात आणि शहरातील गल्ल्यांमध्ये आजच्या दिवशी टिमक्यांचा आवाज कानावर पडतोच. संपूर्ण महाराष्ट्रात खरंतर होळी सण साजरा केला जातो. या सणामध्ये टिमक्यांना अनन्य साधारण असे महत्व आहे. मात्र आता हळूहळू चामडी टिमक्यांची जागा प्लास्टिक तसेच फायबरच्या टीमक्यांनी घेतल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे.

By

Published : Mar 28, 2021, 4:43 PM IST

kolhapur-holi-
kolhapur-holi-

कोल्हापूर - होळी सण म्हटलं की टिमकी ही आलीच. प्रत्येक गावात आणि शहरातील गल्ल्यांमध्ये आजच्या दिवशी टिमक्यांचा आवाज कानावर पडतोच. संपूर्ण महाराष्ट्रात खरंतर होळी सण साजरा केला जातो. या सणामध्ये टिमक्यांना अनन्य साधारण असे महत्व आहे. मात्र आता हळूहळू चामडी टिमक्यांची जागा प्लास्टिक तसेच फायबरच्या टीमक्यांनी घेतल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातल्या बाजारपेठेमध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे, याबाबत माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

यंदाही होळी सणावर कोरोनाचे सावट -

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे होळी सण साजरा करता आला नाही. आता यावर्षी सुद्धा कोरोनामुळे होळी सणावर परिणाम झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शिवाय रात्रीची जमावबंदी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी सण साजरा केला जातो त्याच्या तुलनेत नागरिकांमध्ये उत्साह कमी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी या सणाला कोरोनाचा फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरात टिमकीशिवाय होळी नाही

हे ही वाचा - मेळघाटात पारंपरिक होळी सणाला प्रारंभ

चामड्याला पर्यायी रंगीबेरंगी प्लास्टिक टिमक्या, डमरू बाजारात -

पूर्वी शहरातल्या प्रत्येक चौका-चौकात चामडी टिमक्या विक्रेते पाहायला मिळायचे मात्र चामड्याची अनुपलब्धतेमुळे आता सर्रास प्लास्टिक तसेच फायबरच्या छोट्या ढोल आणि ताशांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून होळी दिवशी टिमक्या वाजविण्याची परंपरा आहे. त्यामुळे लहानांपासून अगदी तरुणांपर्यंत सर्वजण टिमक्या वाजवताना दिसतात. ते चित्र यावर्षी सुद्धा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. शिवाय ग्राहकांची संख्या सुद्धा कमी असल्याचे व्यवसायिकांनी म्हटले आहे.

हे ही वाचा - 'मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार!' दीपाली चव्हाण प्रकरणात नवीन ट्विस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details