महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Crime News : कोल्हापुरात मोठी चोरी! मोबाईलचं अख्खं दुकानच केलं साफ; सीसीटीव्ही डिव्हीआरसुद्धा चोरले - Kolhapur Crime News

कोल्हापूर शहरात ( Major Theft Incident In Kolhapur ) चोरट्यांनी अख्खं मोबाईलचे दुकान साफ करीत, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी जवळ जवळ 70 ते 80 आयफोन चोरी ( Major Theft Incident In Kolhapur ) केले आहेत. या घटनेत विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सर्किट डिव्हिआरसुद्धा काढून नेले आहे. याबाबत शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mobile shop theft
मोबाईल दुकानात चोरी

By

Published : Jul 16, 2022, 8:24 AM IST

कोल्हापूर : कोल्हापुरात एका मोबाईल दुकानात मोठ्या चोरीची घटना समोर ( Major Theft Incident In Kolhapur ) आली आहे. यामध्ये चोरट्यांनी जवळपास 70 ते 80 आयफोन चोरी ( Major Theft Incident In Kolhapur ) केल्याची माहिती मिळत असून, याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. येथील बसस्थानक परिसरात असलेल्या जेमस्टोन इमारतीमधील आय प्लॅनेट या मोबाईलच्या दुकानात ही मोठी चोरी झालीये. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीसुद्धा याच दुकानात चोरी झाली होती, अशी माहिती मालकाने दिली आहे.


यापूर्वीसुद्धा आयफोन चोरीस :दरम्यान, याच आय प्लॅनेट मोबाईल दुकानात यापूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून त्यातील अनेक मोबाईल लंपास केले होते. लाखो रुपयांचे हे आयफोन होते, अशीही माहिती आहे. त्यावेळी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. आतासुद्धा याच दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीतून प्रवेश करीत 70 ते 80 सेकंड हॅन्ड आयफोनची चोरी केली आहे. लाखो रुपये किमतीचे हे मोबाईल होते. दरम्यान, यावेळी चोरट्यांनी मोबाईल तर लंपास केलेच शिवाय दुकानातील सीसीटीव्हीचे सर्किट डिव्हीआर, महत्त्वाचे बिलबुक तसेच इतर साहित्यसुद्धा लंपास केल्याची माहिती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details