कोल्हापूर : पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले असून सदावर्तेयांचा ताबा मिळवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलिस कोर्टात दाखल झाले आहेत. कोल्हापूर सत्र न्यायालयाने सदावर्ते याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Gunratna Sadavarte 14 Days Judicial Custody) सुनावली आहे. त्यानंतर सदावर्ते यांच्याकडून जामीनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले असून सदावर्ते याचा ताबा मुंबई न्यायालयातून घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदावर्ते यांना न्यायालयात नेताना तसेच बाहेर काढताना सुद्धा त्याने 'जय हिंद', 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. शिवाय शाहू नगरीत मला न्याय मिळेल असेही सदावर्ते याने यावेळी म्हंटले. 2020 साली सदावर्ते यांनी माध्यमाच्या मुलाखतीत प्रक्षोभक विधान केले होते. त्या प्रकरणी त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे.