कोल्हापूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, मृत्यूंची संख्या सुद्धा जवळपास 190 पर्यंत पोहोचली आहे. त्यातच आता कोल्हापूरातील एका नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. संतोष गायकवाड असे या नगरसेवकांचे नाव आहे.
कोल्हापूरातील नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू, सर्वत्र भीतीचे वातावरण - कोल्हापूर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
गायकवाड येथील संभाजीनगर प्रभागाचे ते नगरसेवक होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशिवाय पदाधिकाऱ्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली नाहीये. मात्र, नगरसेवकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
गायकवाड येथील संभाजीनगर प्रभागाचे ते नगरसेवक होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशिवाय पदाधिकाऱ्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली नाहीये. मात्र, नगरसेवकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 6 हजार 450 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 1 हजार 744 इतके रुग्ण कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील असून आत्तापर्यंत 39 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.