कोल्हापूर - शहरातील यादवनगर परिसरात सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित असलेल्या जागी, माजी उपमहापौर आणि नुकतेच नागरसेविकेचे पद रद्द झालेल्या शमा मुल्ला यांनी अतिक्रमण करून एका ग्रुपसाठी आरसीसी इमारत बांधली होती. ही इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शमा मुल्ला यांना पालिकेचा दणका; अतिक्रमण करून बांधलेली इमारत केली जमीनदोस्त
सार्वजनिक शौचालयासाठी राखीव जागेत तरुण मंडळासाठी इमारत बांधण्यात आल्याचे कोल्हापुरात उघड झाले. यावर महानगर पालिकेने हातोडा चालवला असून यादवनगरात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
मोक्का कायद्यांतर्गत शमा मुल्ला आणि समीर मुल्ला यांच्यावर कारवाई झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती घेतली. यादरम्यान इंडियन ग्रुपच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम मुल्ला यांनी केले असल्याचे समोर आले होते. त्याचा जिल्हा पोलीस प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून संबंधित अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात यादवनगर येथील अतिक्रमण करून बांधलेली इमारत पाडली.