कोल्हापूर :जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 63 नवे रुग्ण आढळले असून, 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात, म्हणजे 15 मार्च ते 19 मार्च पर्यंत एकूण 310 नवे रुग्ण आढळले असून, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर..
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 51 हजार 126 वर पोहोचली आहे. त्यातील 48 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 409 इतकी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1,708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1,756 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.