महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur News : कोल्हापुरात दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव, उपलब्ध होणार सशुल्क ई पास - inspection for conservation of Ambabais idol

येत्या काही दिवसावर नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री.करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. यंदा पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनासाठी मोफत दर्शना सोबत पेड ईपास दर्शन ( Paid ePass Darshan ) ही ठेवण्यात आले आहे.

Rekhawar
राहुल रेखावार

By

Published : Sep 20, 2022, 5:29 PM IST

कोल्हापूर : येत्या काही दिवसावर नवरात्र उत्सव ( Navratri festival 2022 ) येऊन ठेपला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री.करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव साजरी होत असल्याने भाविकांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण असून प्रशासनाने ही जोरदार तयारी सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषद घेत अंबाबाई दर्शन संदर्भात माहिती दिली.

यावर्षी अंबाबाई मंदिरात पहिल्यांदाच पेड ईपासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पेड ईपास ऑफलाइन स्वरूपात मंदिरातच मिळणार असून या पासची किंमत ही दोनशे रुपये असणार आहे. तर यंदाही भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महाद्वार रोड परिसरातील वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार


दर्शन पास दिवसाला 1000 च देण्यात येणार :कोरोना संसर्गाच्या तब्बल दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरी होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर श्री.करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात साफसफाईचे काम सुरू असून दर्शन आणि सुरक्षा याचेही नियोजन करण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनासाठी मोफत दर्शना सोबत पेड ईपास दर्शन ही ठेवण्यात आले आहे. मात्र या पेड ईपास ला हिंदुत्ववादी संघटना कडून विरोध होत आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, पेड ईपास व्यवस्थेला जास्त विरोध नसून आम्ही पेड ईपास व्यवस्था ही ऑफलाइन पद्धतीनेच राबविणार आहे तर दिवसाला केवळ 1000 पेड ईपास देण्यात येणार आहेत. शिवाय हे पास केवळ मंदिरातील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले असून यामुळे बाजारीकरण ही होणार नाही ही सर्व व्यवस्था शासनाचे नियम व न्यायालयाचे आदेश पाळून तयार करण्यात आले आहेत. ही व्यवस्था राज्यातील अन्य मंदिराबद्दल देखील उपलब्ध आहे. या पेड ईपासमुळे कोणत्याही भाविकाला त्रास होणार नसल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.


मूर्ती संवर्धनासाठी मूर्तीची पाहणी :करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अंबाबाई ची मूर्ती ही अत्यंत जुनी असून त्याची झीज होत आहे. यामुळेच मूर्ती संवर्धनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. 2015 मध्ये ही आर्किऑलॉजिकल ऑफ इंडिया मार्फत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. तसेच दर 2 ते 3 वर्षांनी मूर्तीची पाहणी करण्यात येत असते. मात्र कोरोना काळात निर्बंध असल्याने पाहणी करता आली नव्हती. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी पार पडली असून मूर्तीच्या ज्या काही दुरुस्त्या करणे गरजेचे होते ते करण्यात आले असून पुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मूर्तीचे संवर्धन करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details