महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Women Threw Gas Cylinders in River : महागाईचा भडका, महिलांनी गॅस सिलिंडर फेकले नदीत, थापल्या चुलीवर भाकरी - women threw gas cylinders in Panchganga river

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोल्हापूरातील सुद्धा नागरिक सुद्धा आता वैतागून रस्त्यावर उरतले ( Kolhapur Citizens protest against inflation ) आहेत. आज तर वैतागून पंचगंगा नदीमध्येच महिलांनी गॅस सिलेंडरला फेकून ( Women Threw Gas Cylinders in River ) दिली. शिवाय नदी घाटावरच चूल मांडून झुणका भाकरी बनवल्या. शासनाने सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष देऊन महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा भविष्यात नद्यांमध्ये गॅस सिलेंडरचा खच लागलेला दिसेल असाही इशारा देण्यात आला.

Women Threw Gas Cylinders in River
कोल्हापुरात वाढत्या महागाई विरोधात आंदोलन

By

Published : May 9, 2022, 2:48 PM IST

Updated : May 9, 2022, 4:28 PM IST

कोल्हापूर - देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोल्हापूरातील सुद्धा नागरिक सुद्धा आता वैतागून रस्त्यावर उरतले ( Kolhapur Citizens protest against inflation ) आहेत. आज तर वैतागून पंचगंगा नदीमध्येच महिलांनी गॅस सिलेंडरला फेकून ( Women Threw Gas Cylinders in River ) दिली. शिवाय नदी घाटावरच चूल मांडून झुणका भाकरी बनवल्या. शासनाने सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष देऊन महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा भविष्यात नद्यांमध्ये गॅस सिलेंडरचा खच लागलेला दिसेल असाही इशारा देण्यात आला.

मोफत धान्य देता ते शिजवायचे कसे? -यावेळी आंदोलक महिलांनी सुद्धा केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत महागाईवर नियंत्रण आणून पूर्वीप्रमाणे दर करावेत ही मागणी करण्यात आली. एकीकडे धान्य मोफत देऊन दुसरीकडे गॅस दर वाढवलेत मग आम्ही धान्य कसे शिजवायचे असा प्रश्न सुद्धा महिलांनी उपस्थित केला. यावेळी महिला तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोल्हापुरात महिलांचे आंदोलन

चुलीवर झुणका भाकरी; पुन्हा वृक्षतोडीची भीती -दरम्यान, गॅस दर वाढल्यामुळे महिलांनी रागामध्ये गॅस सिलेंडर पंचगंगा नदीत फेकले आणि नदीकाठीच चूल मांडून झुणका-भाकरी बनवून खाल्ल्या. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश एकीकडे दिला जातो मात्र जर गॅस दर असेच वाढत राहिले तर भविष्यात पुन्हा एकदा वृक्षतोडीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. आणि येरे माझ्या मागल्या अशी म्हणण्याची वेळ येणार असल्याचेही महिलांनी म्हटले. त्यामुळे तात्काळ या महागाईवर नियंत्रण मिळवावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

हेही वाचा -Raut Vs Somaiya : सोमैयांच्या पत्नीची संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार; 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' केली मागणी

Last Updated : May 9, 2022, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details