कोल्हापूर - देश-विदेशातील विविध प्रजातींची एकापेक्षा एक मांजरे पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. येथील मार्केट यार्ड परिसरातील महाराजा हॉल येथे 'फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या' कोल्हापूर शाखेने 'कॅट शो'चे ( Kolhapur Cat Show ) आयोजन केले आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून अनेकजण आपली मांजरे घेऊन या शो मध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये जगातील सर्वात मोठे मांजर तसेच लाखो रुपये किंमतीची मांजरे सुद्धा पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे.
बंगाली कॅट ठरले आकर्षण - या कॅट शो मध्ये विविध प्रजातींची मांजरे सहभागी झाली होती. मात्र, बिबट्यासारखे दिसणाऱ्या 'बंगाली कॅट'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी हुबेहूब बिबट्या सारखे दिसणारे हे मांजर दोन रंगाचे आहे. याची किंमत सुद्धा चक्रावून टाकणारी आहे. एका मांजराची किंमत जवळपास दीड ते दोन लाखांपासून सुरू होते. त्यामुळे अतिशय महागड्या मांजाऱ्यांच्या प्रजातींपैकी ही एक प्रजाती असल्याचे सदस्यांनी सांगितले.
Kolhapur Cat Show : कोल्हापूरातल्या 'कॅट शो' मधील मांजरांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क - कोल्हापूर कॅट शो
'फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या' कोल्हापूर शाखेच्या माध्यमातून मार्केट यार्ड येथे कॅट शोचे ( Kolhapur Cat Show ) आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशी-विदेशी मांजरांच्या प्रजातींनी सहभाग नोंदवला आहे.
![Kolhapur Cat Show : कोल्हापूरातल्या 'कॅट शो' मधील मांजरांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क Kolhapur Cat Show](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14852121-thumbnail-3x2-kolhp.jpg)
Kolhapur Cat Show
फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या सदस्य संवाद साधताना