कोल्हापूर -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काही ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, राणे यांच्या अटकेनंतर राज्यभरात भाजपकडून निदर्शने करण्यात येत आहेत. कोल्हापुरातल्या बिंदू चौक येथेसुद्धा जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
कोल्हापूर भाजपची तीव्र निदर्शने - केंद्रीय मंत्र्यांना अटक ही दुर्देवी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडली : विजय जाधव
यावेळी भाजप सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याची दुर्देवी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या अन्य नेत्यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याबाबत अफजल खानाची सेना, तुडवून मारु अशा पद्धतीची भाषा वापरली. दुसऱ्याकडून आपण अपेक्षा करत असाल तर पहिले आपण पहिल्यांदा चांगले बोला असेही जाधव यांनी म्हंटले. दरम्यान, नारायण राणे यांची अटक हि सूड बुद्धीने करण्यात आली असून या तालिबानी सरकारचा निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे
- 'अशा' सरकारला तालिबानी सरकार का संबोधू नये? - ठाणेकर
भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर म्हणाले, राणे यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यक्तीस ताबडतोब अटक करू नये नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना राणे साहेबांच्या एका वक्तव्यावर राजकीय सूडबुद्धीने मोठ्या यंत्रणा वापरून पोलीस बंदोबस्तात त्यांना जेवणाच्या तटावरून अटक केली. असे कृत्य करणाऱ्या सरकारला तालिबानी सरकार का संबोधू नये? असेही ठाणेकर यांनी म्हंटले.
- मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल अभ्यास करून वक्तव्य करणे अपेक्षित : चिकोडे
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, "लोकशाहीच्या दुष्टीने आजचा दिवस निंदनीय म्हणावा लागेल. दिवसभर घरात बसून असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल अभ्यास करून वक्तव्य करणे अपेक्षित आहे. अभद्र युतीचे सरकार गेल्या दीड वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. कोरोनामुळे या बिघाडी सरकार मधील मंत्र्यांची अनेक चुका झाकल्या गेल्या आहेत आणि त्यावर नीटपणे मत माडनाऱ्या व्यक्ती, नेत्यांवर हे तालिबानी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. देशाचे पंतप्रधान, भाजपा नेते, राज्यपाल, गृहमंत्री यांच्यावर केलेले वक्तव्य चालतात पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली रुचत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता या तीघाडी सरकारचा तालिबानी कारभार प्रत्यक्ष अनुभवत असून आगामी काळात त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असेसुद्धा चिकोडे यांनी म्हंटले.
हेही वाचा -गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर दाखल, राणे अटक प्रकरणावर चर्चा