महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे पुजाऱ्यांकडून स्वागत.. पाहा काय म्हणाले मुनीश्वर - कोल्हापूर महालक्ष्मी माता

आज अंबाबाई मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले असून याचा भक्तांबरोबरच मंदिरातील मुनीश्वर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने भक्त अंबाबाईला भेटण्यासाठी, तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आतूर होते. त्याच पद्धतीने आई अंबाबाई सुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आतुर होती, असे मुनीश्वर यांनी म्हटले आहे.

kolhapur ambabai temple Priests
सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे पुजाऱ्यांकडून स्वागत

By

Published : Nov 16, 2020, 5:21 PM IST

Updated : Nov 16, 2020, 5:27 PM IST

कोल्हापूर - गेल्या आठ महिन्यांपासून करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज अंबाबाई मंदिर सुद्धा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले असून याचा भक्तांबरोबरच मंदिरातील मुनीश्वर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने भक्त अंबाबाईला भेटण्यासाठी तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आतूर होते त्याच पद्धतीने आई अंबाबाई सुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आतुर होती, असेही अंबाबाई मंदिरातील श्री मुनीश्वर यांनी म्हटले आहे.

सरकारच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे पुजाऱ्यांकडून स्वागत
सर्वच पूजाऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत -दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्वच मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण असून अंबाबाई मंदिरातील पूजाऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुद्धा अत्यंत नेटके नियोजन केले असून भक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सुद्धा मंदिरातील श्री मुनीश्वर यांनी केले आहे. मंदिरात सजावट -आज तब्बल 8 महिन्यांनंतर अंबाबाई मंदिर खुले होत असल्याने मंदिराबाहेर मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. त्याच पद्धतीने मंदिरात सुद्धा फुलांची सजावट करून रांगोळी काढण्यात आली आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडी खांबावर विद्युत रोषणाई सुद्धा केली गेलीये. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे.
Last Updated : Nov 16, 2020, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details