महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा आजपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर....

By

Published : Apr 9, 2022, 10:37 PM IST

गेल्या 21 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे, कारण पृथ्वीराज पाटीलच्या रूपाने यंदा महाराष्ट्र केसरीची ( Maharashtra Kesari 2022 ) गदा कोल्हापूरकडे आली आहे. अगदी लहानपणापासूनच पृथ्वीराजचा तालमीमध्ये शड्डू घुमत होता. अनेक वर्षांची मेहनत आज फळाला आली आणि महाराष्ट्र केसरीचा किताब ( Prithviraj Patil Won Maharashtra Kesari 2022 ) त्याने आपल्या नावे केला.

Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022

कोल्हापूर -गेल्या 21 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे, कारण पृथ्वीराज पाटीलच्या रूपाने यंदा महाराष्ट्र केसरीची ( Maharashtra Kesari 2022 ) गदा कोल्हापूरकडे आली आहे. अगदी लहानपणापासूनच पृथ्वीराजचा तालमीमध्ये शड्डू घुमत होता. अनेक वर्षांची मेहनत आज फळाला आली आणि महाराष्ट्र केसरीचा किताब ( Prithviraj Patil Won Maharashtra Kesari 2022 ) त्याने आपल्या नावे केला. पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत केले. शिवाय त्याने बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला. अवघ्या 22 व्या वर्षी त्याने हा किताब पटकावून अखंड कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापुढे ऑलम्पिक हेच त्याचे ध्येय असल्याचे त्याने म्हटले आहे. पृथ्वीराज यांच्या आजपर्यंतच्या कार्यकिर्दीवर एक नजर.

पृथ्वीराज पाटीलचा लहानपणीचा फोटो

पृथ्वीराज पाटील याची वयक्तिक माहिती :पृथ्वीराज बाबासाहेब पाटील याचा जन्म कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्याती देवठाणे येथं झाला. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यापूर्वी त्याने मोतीबाग तालीममधून सुरुवात कुस्तीला सुरूवाद केली होती. तो हिंदकेसरी पैलवान दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील तसेच पैलवान धनाजी पाटील या वस्ताद मानतो. पृथ्वीराज सैन्यदलात नोकरी करत असून सद्या बेळगाव येथील आर्मी कॅम्पमध्ये कार्यरत आहे.

महाराष्ट्र केसरी अंतिम सामना

आजपर्यंतच्या शालेय स्थरापासूनच्या महत्वाच्या स्पर्धा आणि कामगिरी (गादी गटातून) :

  • 2018-19 शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, इचलकरंजी 92 किलो रौप्यपदक
  • 2019 -20 शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, संजीवन नॉलेज सिटी पन्हाळा, 92 किलो रौप्यपदक
  • 2019 - 2020 महाराष्ट्र केसरी, बालेवाडी-पुणे 92 किलो सुवर्णपदक
  • 2019 - 2020 खेलो इंडिया, आसाम 97 किलो सुवर्णपदक
  • 2019-20 कुंभी मानधनधारक स्पर्धा, ओपन गट
  • 2020 - 2021 सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, नोएडा-उत्तरप्रदेश 92 किलो रौप्यपदक
  • 2020- 2021 ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, नोएडा-उत्तरप्रदेश, सुवर्णपदक 92 किलो
  • 2020 - 2021 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, खुला गट कोल्हापूर जिल्हातून निवड
  • 2021 ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड तसेच रशियाच्या पैलवानावर विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई
  • आज 9 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र केसरी विजेता

देवठाणे गावात जल्लोष :दरम्यान, असे अनेक लहान मोठ्या स्पर्धांमध्ये पृथ्वीराजने आजपर्यंत आपली दमदार कामगिरी पार पाडली आहे. विशेष म्हणजे पन्हाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवत त्याच्या रूपाने 22 वर्षांचा दुष्काळ आता मिटला आहे. पृथ्वीराजच्या या यशानंतर त्याच्या मूळ गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला आहे. गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा -Silver Oak Attack Case DCP Transfer : शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर डीसीपींची उचलबांगडी

ABOUT THE AUTHOR

...view details