महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे; जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती - किरीट सोमैया कोल्हापूर

डॉ. किरीट सोमैया यांच्या संभाव्य कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सार्वत्रिक हिताच्या दृष्टीकोनातून 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 21 सप्टेंबर 2021 रोजीपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 (1)(3) अन्वये बंदी आदेश करण्यात आला होता.

राहुल रेखावार
राहुल रेखावार

By

Published : Sep 21, 2021, 2:53 PM IST

कोल्हापूर -जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांनी माजी खासदार डॉ. किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांच्या संभाव्य कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व राहण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. 19 सप्टेंबर 2021 रोजी पारित केलेला हा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतला आहे.

पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास बंदी

माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या संभाव्य कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सार्वत्रिक हिताच्या दृष्टीकोनातून 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 21 सप्टेंबर 2021 रोजीपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 (1)(3) अन्वये बंदी आदेश करण्यात आला होता.

दौरा केला रद्द

20 सप्टेंबर 2021 रोजीचा सोमैया यांचा तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित राजकीय व्यक्तींचा कोल्हापूर दौरा सद्यस्थितीत रद्द झाला असल्यामुळे पारित करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी राहूल रेखावार यांनी हा आदेश मागे घेतला असल्याची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details