महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hasan Mushrif : किरीट सोमय्या सहा महिन्यापासून प्रयत्न करताहेत, चौकशीला सामोरे जायला मी तयार - हसन मुश्रीफ - किरीट सोमय्याची हसन मुश्रीफ विरोधात तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात पुन्हा ट्विट केले ( Kirit Somaiya Tweet Against Hasan Mushrif ) आहे. त्यामध्ये मुश्रीफ यांनी घोटाळा केला असून, त्यांच्याविरोधात पुण्यातील न्यायालयात दाद मागितली ( Kirit Somaiya Complaint Against Hasan Mushrif ) आहे. यावर मुश्रीफ यांना प्रतिक्रिया विचारली असता, किरीट सोमय्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी जी चौकशी होईल त्याला सामोरे जाण्यास मी तयार आहे, असे ( Hasan Mushrif On Kirit Somaiya Tweet ) सांगितले.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

By

Published : Apr 1, 2022, 3:44 PM IST

कोल्हापूर :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट ( Kirit Somaiya Tweet Against Hasan Mushrif ) केल्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापुरात यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे प्रयत्न सुरू असून, तपासासाठी आपण सर्व सहकार्य करू असे त्यांनी महटले ( Hasan Mushrif On Kirit Somaiya Tweet ) आहे. तर दुसरीकडे गृहविभागवर शिवसेना-काँग्रेसचे नेते नाराज आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, महाविकास आघाडीचे तीन नेते यासंदर्भात चर्चा करतील, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने ही निवडणूकीच्या प्रचारादरम्यान खालच्या पातळीवर वापरल्या जाणाऱ्या भाषेवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून किरीट सोमय्याचे प्रयत्न: सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. सोमय्या आज, पुण्यात मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे. सोमय्या यांनी ट्विट करून आपल्या पुणे दौर्‍याविषयी माहिती दिली आहे. आपण शुक्रवारी पुण्यात जाणार असून, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटीत १५८ कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी कागदपत्रे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर या ट्विटला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले किरीट सोमय्या गेल्या सहा ते सात महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. जी चौकशी होईल त्याला मी सामोरे जाऊ तसेच योग्य ते सहकार्य करू असे ही त्यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या सहा महिन्यापासून प्रयत्न करताहेत, जी चौकशी होईल त्याला सामोरे जायला मी तयार - हसन मुश्रीफ


सर्व शंकांच निरसन दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं आहे: कालच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गृहमंत्रालयात विरोधात नाराजी असल्याचे सूर पाहायला मिळत होते. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, महाविकासआघाडीमधील तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवतील. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतची चर्चा झाली असून, सर्व शंकांचे निरसन दिलीप वळसे पाटील यांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अंतर्गत कोणतेही धुसफूस नसून, महाविकासआघाडी ही भक्कम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details