कोल्हापूर: गेल्या अडीच वर्षात कोल्हापूरचा विकास ठप्प झाला आहे. कोल्हापुरात कोणत्याच प्रकारच्या विकासाला चालना मिळाली नाही. पण मुंबई महापालिकेशी कोल्हापूरकर भ्रष्टाचाराच्या बाबतीत स्पर्धा करत असल्याचे, वक्तव्य भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आज पत्रकार परिषदेत ( Press conference of Keshav Upadhyay ) केले. कोविड काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेत खरेदी करण्यात आलेले मास्क, मृतदेह झाकण्यासाठी असलेली बॅग यासारख्या अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, एकूण 88 कोटी रुपयाची बिले दिली गेली आहेत. यावर अंतर्गत ऑडिट झाल्यानंतर ही पालकमंत्री गप्प का? कोणाच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? -सध्या कोल्हापुरात उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे महविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत येते पाहायला मिळत आहे. भाजपने प्रचारासाठी राज्यातील अनेक मोठ्या नेते मंडळींना कोल्हापुरात बोलावले आहे.तसेच रोज आरोप प्रत्यारोपांच्या फाईली झडू लागल्या आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय ( BJP spokesperson Keshav Upadhyay ) यांनी आज पत्रकार परिषद घेत पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोविड काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोरोडोचे घोटाळे झाले असून यावर पालकमंत्री गप्प का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.