कोल्हापूर -कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने अखेर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. आज ( 14 मे ) पहाटे 6 वाजता जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माउंट एव्हरेस्ट तिने सर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी याबाबत माहिती ( Kolhapur Kasturi Savekar Scales Mount Everest ) दिली.
गतवर्षी आले होते अपयश - कस्तुरी सावेकर हिने गतवर्षी सुद्धा माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेला गेली होती. केवळ शेवटचाच टप्पा राहिला असताना खराब वातावरणामुळे तिला मोहिम तिथेच थांबवून पुन्हा परतावे लागले होते. मात्र, एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द तिने सोडली नाही. आज अखेर तिने एव्हरेस्ट सर करून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे.