कोल्हापूर - कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले तसेच खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. आज (गुरुवारी) सकाळी त्यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. जोल्ले कुटुंबीयांची अंबाबाईवरती प्रचंड श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात न चुकता ते अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षीसुद्धा त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशातून कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि सर्व काही पूर्वपदावर येऊ दे, अशी प्रार्थना सुद्धा अंबाबाई चरणी केली.
कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन - कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले़
जोल्ले कुटुंबीयांची अंबाबाईवरती प्रचंड श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात न चुकता ते अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षीसुद्धा त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशातून कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि सर्व काही पूर्वपदावर येऊ दे, अशी प्रार्थना सुद्धा अंबाबाई चरणी केली.
आई अंबाबाईच्या दर्शनाला दरवर्षी आम्ही सहकुटुंब सहपरिवार येत असतो. यावर्षी सुद्धा सहकुटुंब आम्ही अंबाबाई तसेच श्रीक्षेत्र ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय तसेच सामाजिक कार्यात अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच वाटचाल करत आलो आहे. शिवाय त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालो, असल्याचे शशिकला जोल्ले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिरांचे दरवाजे उघडले आहेत. लवकरच कोरोना पूर्णपणे नाहीसा होऊन सर्वकाही पूर्वपदावर येऊ देत, असे अंबाबाई चरणी साकडे सुद्धा त्यांनी यावेळी घातले.
हेही वाचा -दीक्षाभूमी अनुयायांच्या स्वागतासाठी सज्ज; नागपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त