महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी - कळंबा कारागृह अधीक्षकपदी चंद्रमणी इंदूरकर न्यूज

कळंबा कारागृहात 10 मोबाईल आणि पाऊण किलो गांजा दोन अज्ञात व्यक्तींनी फेकला होता. 23 डिसेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. फेकलेले तीन गठ्ठे तपासले असता त्यात गांजासह मोबाईल सापडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात व्यक्ती एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यांचा परिसरात तपास लागला नाही. यानंतर कारागृहाचे अधीक्षक शेळके यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके न्यूज
कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके न्यूज

By

Published : Dec 25, 2020, 1:26 PM IST

Updated : Dec 25, 2020, 1:44 PM IST

कोल्हापूर - कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये 10 मोबाईलसह मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा दोन अज्ञात व्यक्तींनी कारागृहाच्या भिंतीवरून आतमध्ये फेकला होता. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि याची गांभीर्याने दखल घेत शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. येरवडा कारागृह येथे त्यांची बदली केल्याची माहिती मिळत असून त्यांचा पदभार आता चंद्रमणी इंदूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके न्यूज

हेही वाचा -दादर, माहीम, धारावीतील पेट्रोल पंप, ज्वेलरी कर्मचाऱ्यांच्या होणार कोरोना चाचण्या


काय आहे नेमकं प्रकरण -

कळंबा कारागृहात 10 मोबाईल आणि जवळपास पाऊण किलो गांजा दोन अज्ञात व्यक्तींनी फेकला होता. 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. हा प्रकार येथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर फेकलेले तीन गठ्ठे तपासले असता त्यामध्ये गांजासह मोबाईल सापडले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात व्यक्ती एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आल्याचे दिसून आले होते. त्यांचा परिसरात तपास घेतला असता पोलिसांना यामध्ये यश आले नाही. मात्र, कारागृहात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आणि मोबाईल फेकण्याचे धाडस केल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणूनच अधीक्षक शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार चंद्रमणी इंदूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.


हेही वाचा -मराठा समाजाला EWS आरक्षण; संघटनांमधून मात्र नाराजीचा सूर

Last Updated : Dec 25, 2020, 1:44 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details