कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने आता न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील प्रमुख वकील यामध्ये सहभागी होणार आहेत.
मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात येत्या रविवारी 'न्यायिक परिषद'चे आयोजन
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने आता न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले.
सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यासाठी वकिलांचे विचारमंथन केले जाणार आहे. या बैठकीला मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या केसची बाजू मांडणारे वकील आशिष गायकवाड हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
रस्त्यावरची लढाई तर सुरू राहणारच आहे, मात्र आता न्यायालयातील लढाईसाठी या न्यायिक परिषदेचे आयोजन केले आहे. ही लढाई मजबूत करण्यासाठी 6 जिल्ह्यातील वकिलांची तसेच सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विचारमंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करम्यात आले असल्याचे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत प्रा. जयंत पाटील, दिलीप देसाई, जयेश कदम, बाबा इंदुलकर, विवेक घाटगे, राजीव लिंग्रस, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.