महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही - सुभाष देसाई - मनसे बद्दल बातमी

बेगड्या हिंदुत्वावाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

industries-minister-subhash-desai-criticizes-mns
बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही - सुभाष देसाई

By

Published : Feb 8, 2020, 8:14 PM IST

कोल्हापूर -बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. रवीवारी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सूचक विधान केले. आम्ही कधीही हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. मात्र, काही मतलबी लोक शिवसेनेवर टीका करत असल्याचा आरोप देखील देसाई यांनी केला आहे.

बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही - सुभाष देसाई

हेही वाचा -आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात शिवसेनेकडून निषेध

हिंदुत्वावर जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनेइतकी धाडसीपणे कुणीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे हिंदुत्वाचे पाठीराखे आपल्याकडे यावेत असा काहींचा प्रयत्न असल्याचा टोला देखील सुभाष देसाई यांनी लागवला आहे. एका कार्यक्रमानिमित्त ते कोल्हापूरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

होही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी साधला संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details