कोल्हापूर -सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र, आज (गुरूवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी व इतर ठिकाणी प्राप्तिकर विभागाने घातलेल्या छाप्यामागे काही राजकीय हात आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुश्रीफांच्या घरावरील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामागे राजकीय हात? - politics
मागील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले होते. यावर मुश्रीफ यांनी नकार दिला होता. त्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकल्यामुळे या मागे राजकीय हात आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले होते. यावर उत्तर देताना मुश्रीफ यांनी नकार दिला होता. या घटनेला आठवडा झाला नाही तोच ही कारवाई करण्यात आली असल्याने लोकांमध्ये उलट-सुलट चर्चा पाहायला मिळत आहे आहे.
मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या तसेच टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरीदेखील छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. पण या करवाईत काय उघडकीस येते याकडे सर्वांच्या लक्ष लागलेले आहे.