महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या झेंड्यावर बसवले श्वान - युवक काँग्रेस निषेध कोल्हापूर

कर्नाटकमधील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना गुरुवारी घडली. यानंतर आता त्याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे.

shivaji maharaj statue defamation congress protest
युवक काँग्रेस निषेध कोल्हापूर

By

Published : Dec 18, 2021, 6:49 PM IST

कोल्हापूर - कर्नाटकमधील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना गुरुवारी घडली. यानंतर आता त्याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. कोल्हापुरात युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या लाल - पिवळ्या झेंड्यावर श्वान बसवत निषेध व्यक्त केला. तसेच शाई टाकून व झेंडा जाळून विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध केला.

निषेध व्यक्त करताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी

हेही वाचा -Karnataka Vehicles Blacked Out : कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना फासले काळे, शिव पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्याचे तीव्र पडसाद कर्नाटक सीमाभागासह महाराष्ट्रात उमटत आहेत. कोल्हापुरात सकाळी पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेने कर्नाटकच्या गाड्या आडवून गाड्यांच्या नंबर प्लेटना काळे फासले. तसेच, गाडीवर जय महाराष्ट्र लिहीत घटनेचा निषेध व्यक्त केला. आता शिवसेना पाठोपाठ काँग्रेसही आक्रमक झाली आहे.

कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने मिरजकर तिकटी येथे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्र येत कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या लाल - पिवळ्या झेंड्यावर श्वान बसवत निषेध व्यक्त केला. तसेच, शाई टाकून व झेंडा जाळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दिपक थोरात, अक्षय शेळके, रणजीत पवार, रवी आवळे, आकाश शेलार, उमेश पोर्लेकर, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्नाटकची पोलीस व्हॅन घटनास्थळी

दरम्यान या ठिकाणी एक कर्नाटक पोलीस व्हॅन लावण्यात आली होती. त्यामुळे, काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांची विचारपूस केली. आपण अंबाबाई दर्शनासाठी आलो असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. या नंतर ही गाडी त्या ठिकाणाहून मार्गस्थ झाली.

हेही वाचा -इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारा अन् मिळवा मालमत्ता करात सूट.. कोल्हापूर महापालिकेचा अभिनव उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details