महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ideal Marriage In Kolhapur : सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान; शिरोळमधील आदर्शवत विवाह सोहळा - शिरोळ तालुक्यातील पुनर्विवाह

कोल्हापूर तालुक्यात केवळ विधवा प्रथा बंदीचा केवळ निर्णय घेतला नाहीये तर एका गावात विधवा महिलेचा पुनर्विवाह करण्यात ( Widow Remarriage ) आला आहे. विशेष म्हणजे विधवा महिलेच्या सासू सासऱ्यांनीच तिचे कन्यादान केले आहे. आई वडीलांना ज्या पद्धतीने मूलगीला निरोप देताना रडू कोसळते अगदी त्याप्रमाणेच सासू सासऱ्यांनाही सुनेला निरोप देताना हुंदका आवरता आला नाही. ( Ideal Marriage In Kolhapur )

Ideal Marriage In Kolhapur
सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान

By

Published : Jul 1, 2022, 8:17 PM IST

कोल्हापूर - विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतलेला शिरोळ तालुका आता पुन्हा एका घटनेमुळे चर्चेत आला आहे. कारण या तालुक्यात केवळ विधवा प्रथा बंदीचा ( Widow Remarriage ) केवळ निर्णय घेतला नाहीये तर एका गावात विधवा महिलेचा पुनर्विवाह करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधवा महिलेच्या सासू सासऱ्यांनीच तिचे कन्यादान केले आहे. आई वडिलांना ज्या पद्धतीने मूलगीला निरोप देताना रडू कोसळते अगदी त्याप्रमाणेच सासू सासऱ्यांनाही सुनेला निरोप देताना हुंदका आवरता ( shirol Remarriage of widow ) आला नाही. कोण आहेत हे सासू सासरे आणि कोणत्या गावाने हा आदर्शवत असा निर्णय घेतला, पाहुयात या विशेष रिपोर्टमधून..

सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान

ग्रामीण भागातील लोकांची सुद्धा मानसिकता बदलली -एखाद्या उच्चभ्रू लोकांना सुद्धा लाजवेल असा आदर्शवत निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील यड्राव गावातील नावलगी कुटुंबाने घेतला. चलनादेवी व लक्ष्मण नावलगी यांच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनंतरच त्याचे निधन झाले अन् सून दीपा नावलगी विधवा झाली. या घटनेला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वतःचा मुलगा गमावल्याचे दुःख तर होतेच मात्र सुनेचा अपूर्ण संसार पाहून त्यांना सुद्धा पहावत नव्हते. शेवटी सासू सासऱ्यांनीच सुनेला पुनर्विवाह करण्याबाबत आग्रह केला. आम्हाला अर्ध्यावरील हा संसार पहावत नाही म्हणत सासू सासऱ्यांनी हे तुझं माहेरच आहे, लग्नानंतर सुद्धा कधीही येऊ शकतेस म्हणत तिचा पुनर्विवाह करून दिला. शिरोळ सारख्या जिल्ह्यातील यड्राव गावातील नावलगी कुटुंबाने घेतलेल्या या आदर्शवत निर्णयानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान

गडहिंग्लज येथील तरुणाशी पुनर्विवाह -गडहिंग्लज तालुक्यातीलच बेकनाळच्या प्रमोद टिपुगडे या युवकाशी नावलगी यांची सून दिपा हिचा पुनर्विवाह करण्याचे ठरले. त्यानुसार नुकताच यड्राव येथील रेणुकानगरमध्ये दिपा आणि प्रमोद यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी सासू, सासरे यांनी दिपाला मुलगी समजूनच तिच कन्यादान केले. सुनेला स्वत:ची मुलगी मानून तिचा पुनर्विवाह करुन दिला असल्याचे सासू सासऱ्यांनी म्हंटले. शिवाय यड्रावला सासर न समजता माहेर समजून 'जेंव्हा येऊ वाटेल तेंव्हा आई वडील समजून आपली भेट घ्यायला ये' असे सुद्धा सासू सासऱ्यांनी म्हंटले. एकीकडे हेरवाड गावाची सर्वत्र चर्चा सुरू असताना यड्राव गावातील या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे सुद्धा सर्वत्र कौतुक सुरू आहे.

सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान

सुनेला निरोप देताना संपूर्ण नावलगी कुटुंबाला अश्रू अनावर -दरम्यान, चलनादेवी नावलगी या सासूनेच आपल्या विधवा सुनेचे कन्यादान करुन तिचा पुनर्विवाह तर केलाच पण निरोप देताना सुद्धा त्यांना अश्रू अनावर झाले. जणू आई आपल्या मुलीला निरोप देत असल्याचे चित्र पाहून अनेकजण आनंदअश्रुंनी भारावले.

ग्रामपंचायतींनी घेतला होता निर्णय - शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी आणि राधानगरी या दोन्ही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करून तेवढ्यावरच न थांबता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा महिलांना अमेक कार्यक्रमांमध्ये हळदी कुंकवासाठी आमंत्रित करून कृतीद्वारे सन्मान दिला आहे. शिवाय अनेक महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी अनुक्रमे टाकळीवाडी ग्रामपंचायतने 10 हजार आणि राधानगरी ग्रामपंचायतने 11 हजारांचे अनुदान जाहीर केले आहे. टाकळीवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच बाजीराव गोरे यांच्यासह सरपंच तसेच सदस्यांनी हा निर्णय घेतला तर राधानगरी गावच्या लोकनियुक्त सरपंच कविता शेट्टी यांच्यासह उपसरपंच तसेच सदस्य गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.

सासू-सासऱ्यांनीच केले सुनेचे कन्यादान

हेही वाचा - Grant to Widows : एक पाऊल पुढे! कोल्हापुरातील दोन ग्रामपंचायतींकडून पुनर्विवाहासाठी विधवांना अनुदान जाहीर

हेही वाचा -Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

हेही वाचा -Now Vadapav Burger Available In Kolhapur : कोल्हापूरात मिळतोय चक्क वडापाव बर्गर, खवय्यांच्या जिभेची चव जपणार

ABOUT THE AUTHOR

...view details