कोल्हापूर : उन्हाळा सुरू झाला की सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. आपल्याला ठीकठिकाणी कलिंगड विक्री करणारे नजरेस पडतात. मात्र कलिंगड विकत घेताना सर्वानाच पडणारा प्रश्न म्हणजे, आपण घेत असलेले कलिंगड आतमधून गोड आणि लालसर असेल की नाही? शेतकरी आणि व्यापारी कलिंगड आतून गोड असेल की नाही हे बरोबर सांगत असतात. कलिंगड आतून गोड आहे की नाही, हे ओळखण्याच्या नेमक्या काय पद्धती आहेत? कोणकोणत्या प्रकारचे कलिंगड बाजारात असतात पाहुयात, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून...
अनेक प्रकारची कलिंगड बाजारात :
कोल्हापूरातील फळ विक्रेत्या मोहम्मद पंजाबी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांच्या स्टॉलवर अनेक प्रकारची कलिंगड ते आणत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने शुगर क्वीन, मेलडी, नामधारी, मधुबाला, मॅक्स आदी स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलिंगडला जास्त मागणी असते असे त्यांनी सांगितले. ते स्वतःच्या स्टॉलवर थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच कलिंगड घेत असतात. काही वेळा मार्केट मधून घ्यावे लागते. खरंतर या सर्वच जातीमधील कलिंगड गोड असतात त्यामुळे आम्ही त्यालाच प्राधान्य देत असतो असेही त्यांनी सांगितले.
कलिंगड वाजवून ते तयार झाले आहे की नाही ओळखणे :
खरंतर प्रत्येकालाच तयार झालेले म्हणजेच आतून लाल आणि खायला गोड असे कलिंगड हवं असतं. त्यामुळे प्रत्येकजण कलिंगड तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी एक गोष्टी नेहमी नक्कीच करत असतात ते म्हणजे कलिंगड वाजवून, त्यावर टिचकी मारून त्याचा आवाज कडक येतो की नाही. मात्र कलिंगड आतून तयार झालेले असेलच असे नाही. काही व्यापारी आणि शेतकरी मात्र अशा आवाजावर सुद्धा कलिंगड तयार झालं आहे की नाही ओळखत असतात. जर कलिंगडवर हाताने ठोकल्यानंतर एकदम कडक आवाज आला तरच कलिंगड तयार झालेले आहे असे समजले जाते. तर आवाज अगदी नरम आला तर ते तयार झालेले नाही असे ओळखतो असे कलिंगड व्यावसायिक मोहम्मद पंजाबी यांनी सांगितले.
कलिंगड तयार झालं आहे की नाही याची लक्षणे :