महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ambabai Temple अंबाबाईच्या खजिन्यात किती किलो सोनं आणि चांदी आहे ? पाहा सविस्तर माहिती - Ambabai temple treasury in kolhapur

Ambabai Temple अंबाबाईच्या खजिन्यात किती किलो सोनं आणि चांदी आहे माहिती आहे का ? कोण साभाळतं एवढं सोनं ? पाहा सविस्तर मुलाखत

Ambabai Temple
Ambabai Temple

By

Published : Sep 23, 2022, 6:56 PM IST

Updated : Sep 26, 2022, 4:46 PM IST

कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागिने आहेत. जे आजपर्यंत अनेकांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाहिले आहेत. मात्र यामध्ये नित्यालंकार आणि जडावाचे दागिने सोडून अनेक दागिने आहेत, जे आजपर्यंत कोणीही पाहिले नाही. वर्षानुवर्षे हे दागिने अंबाबाईच्या खजिन्यात ठेवण्यात आले आहेत. याची जबाबदारी सुद्धा 300 वर्षांपासून एका कुटुंबावर आहे. कोण आहेत, ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे आणि अंबाबाईच्या खजिन्यात नेमके किती किलो सोनं आणि किती किलो चांदी आहेत.

शंभर किलो पेक्षा जास्त सोनं तर एक टन हुन अधिक चांदीअंबाबाईच्या खजिन्यात सर्व सोनं मिळून शंभर किलोपेक्षाही अधिक सोनं आहे तर एक टन पेक्षाही अधिक चांदीचा समावेश आहे. सद्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 21 किलो सोने केवळ 2013 ते 2020 या 7 वर्षात अर्पण केले आहे. तसेच 26 किलो वजनाच्या सोन्यापासून बनवलेली पालखी सुद्धा अर्पण करण्यात आली आहे. 2013 पूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने अर्पण ( Offering gold and silver ornaments ) करण्यात आले आहेत. त्याची आकडेवारी जवळपास 80 किलो सोने तर 900 किलोपेक्षाही अधिक चांदीचा समावेश आहे. सोने चांदी शिवाय अंबाबाईच्या खजिन्यात अनेक अमूल्य असे दागिने सुद्धा आहेत. देवीच्या दागिन्यांच्या या मौल्यवान खजिन्यात रत्नजडित किरीट, हिऱ्याची नथ, मोत्याची माळ, कवड्याची माळ, श्रीयंत्र हार, जडावाचे मयूर कुंडले, सोन्याचा किरीट, सोळा पदरी चंद्रहार, 84 मण्यांचा लफ्फा, मोर पक्षी, अशा अनेक दुर्मिळ अलंकारांचा समावेश आहे. शिवाय शिवकालीन कवड्यांची माळ ज्याची किंमत करणेही कठीण आहे. अनेक दागिने आदिलशाह काळातील असून ते अमूल्य असल्याची माहिती सुद्धा खजिना सांभाळणारे महेश खांडेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

दागिने सांभाळण्यासाठी 300 वर्षांची परंपरा दरवर्षी, नवरात्रोत्सव जवळ आल्यानंतर आंबाबईच्या सर्वच सोन्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते आणि याचवेळी देवीचे सर्व दागिने पाहायला मिळतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून देवीचे हे मौल्यवान दागिने सांभाळण्याची जबाबदारी कोल्हापुरातल्या खांडेकर कुटुंबावर आहे. 2013 पासून या दागिन्यांचे खजिनदार (हवालदार) म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी खजिनदार महेश खांडेकर ( Treasurer Mahesh Khandekar ) यांच्याकडे आहे. महेश खांडेकर यांच्याकडे त्यांचे वडील महादेव खांडेकर यांच्याकडून ही जबाबदारी आली. गेल्या 300 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या कुटुंबावर खजिनदार म्हणून जबाबदारी आहे. इंद्रोजी खांडेकर यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली असून त्यांच्या 11 व्या पिढीकडे म्हणजेच महेश खांडेकर यांच्याकडे आजही दागिन्यांची जबाबदारी आहे. त्यांनीही ही परंपरा कायम ठेवली असून आता त्यांना यासाठी मानधनसुद्धा मिळते. अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात हा संपूर्ण खजिना ठेवला जातो. त्यावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असते. 5 ते 6 सुरक्षारक्षक आहेत. दररोज दुपारी आंघोळीनंतर देवीचे नित्यलंकार बाहेर काढून ते देवीला घातले जातात आणि रात्री पुन्हा सुखरूप खजिन्यात ठेवले जातात. नवरात्रोत्सव आणि सणासुदीला मात्र देवीला जडावाचे दागिने घातले केले जातात. नवरात्रोत्सवात रात्री उशिरा दागिने पुन्हा काढून ठेवले जातात. गेल्या 300 वर्षांपासून खांडेकर कुटुंबाकडे अंबाबाईच्या दागिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असून त्यांनी आजही ही परंपरा कायम ठेवली आहे.

पाहा सविस्तर माहिती

2020 ते 22 पर्यंत 'इतके' दान झाल्याचा अंदाज भक्तांनी कोरोना काळात सुद्धा दागिने दान केले आहे. मात्र याच 2020 ते 2022 या आर्थिक वर्षात सप्टेंबर पर्यंत दान केलेल्या सोन्याचे मूल्यांकन झाले नाही. ते सुद्धा लवकरच होणार आहे. दरवर्षी अंदाजे 2 ते 3 किलो सोने तर मोठ्या प्रमाणात चांदीच्या दागिने सुद्धा भक्त अंबाबाई चरणी अर्पण करत असतात. त्यामुळे या दोन वर्षांच्या काळात किमान 3 ते 4 किलो सोने आले असावे असा अंदाज आहे.

खजिन्यात किती किलो सोनं आणि चांदी?

2017 साली अंबाबाई चरणी 'सुवर्ण पालखी'अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या माध्यमातून सुवर्ण पालखी साठी 26 किलो सोन्याची गरज होती. त्यानुसार भक्तांना सोने दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तब्बल दोन वर्ष या माध्यमातून विविध ठिकाणांहून अंबाबाईच्या सुवर्ण पालखी साठी भाविकांनी सोने तसेच पैशांच्या स्वरूपात देणगी अर्पण केली. 2017 साली पालखीचे काम पूर्ण झाले आणि 'अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या माध्यमातून बनविण्यासाठी आलेली सोन्याची आकर्षक पालखी विधिवत पूजा करून अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आली.

Last Updated : Sep 26, 2022, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details