कोल्हापूर : सत्ता स्थापन होऊन एक महिना झाला तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला ( Cabinet will be Expanded Soon ) जाईल, असे सांगितले जात आहे. अनेक माजी मंत्र्यांना पुन्हा मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून सर्वात प्रथम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( State President Chandrakant Patil ) यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी महसूलमंत्री ( Former Revenue Minister Chandrakant Patil ) म्हणून काम पाहिले आहे. त्याशिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनसुद्धा ते जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रकांत पाटील हे नावचे एक ब्रँड झाले आहे. 2004 साली म्हणजे केवळ 18 वर्षांपासून राजकारणात असलेले चंद्रकांत पाटील सध्याचे राजकारणातील ब्रँड कसे झाले ? काय आहे त्यांचा एकूणच प्रवास ?
चंद्रकांत पाटील यांचे आई-वडील गिरणी कामगार :चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर हे जरी असले तरी त्यांचा जन्म हा मुंबईतील रे रोड येथील एका प्रभुदास चाळीमध्ये झाला. चंद्रकांत पाटील यांचे आई-वडील दोघेही गिरणी कामगार होते. त्यामुळे गिरणी कामगार असल्याने ते राहायला मुंबईतच होते. त्यावेळी महाराष्ट्रातून नागरिक मुंबईला गिरणी कामाकरिता नागरिक स्थायिक होत.
मुंबईतच पार पडले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण : त्यामुळे त्यांची संपूर्ण जडणघडण आणि शिक्षण मुंबईमध्येच पार पडले. राजा शिवाजी विद्यालय या दादरमधील शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. तर सिद्धार्थ महाविद्यालयामधून त्यांनी बीकॉमपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतले. सध्या ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. कोल्हापुरातील संभाजीनगर येथे ते आपल्या परिवारासोबत राहतात.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य : दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना महाविद्यालयीन काळापासूनच संघटनात्मक कार्याची आवड होती. त्या वेळीपासूनच यशवंतराव केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. ऑगस्ट 1980 मध्ये जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर जळगावमध्ये 1983 पर्यंत संघटन बांधणी केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्राचे संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. आपल्या कार्याचा सपाटाच सुरू ठेवल्याने त्यांना थेट राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी मिळाली. त्यांनी ही जबाबदारी 1990 ते 1994 कालावधीत पार पाडली. यादरम्यान त्यांनी काश्मीर प्रश्नावर एक मोहीम हाती घेतली होती, त्याचीसुद्धा मोठी चर्चा झाली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय :1994 पर्यंत चंद्रकांत पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत नेतृत्व करीत आले. त्यानंतर त्यांनी प्रचारक पदावरील काम थांबवत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एन्ट्री केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात 1995 ते 1999 या कालावधीत त्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी मिळाली. 1999 ते 2004 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती. सतत 13 वर्षे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य करणारे चंद्रकांत पाटील हे रामभाऊ माळगी प्रबोधनी या संस्थेचे जानेवारी 1994 ते 2000 पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते. तर एप्रिल 2000 ते 2013 पर्यंत त्यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी होती.
राजकीय प्रवासाला सुरुवात आणि भूषविलेली पदे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सक्रिय वाटचालीनंतर, तेथील उत्तम कामगिरीनंतर 2004 मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ते जवळचे मानले जात होते. त्या तिघांच्याच आग्रहास्तव चंद्रकांत पाटील हे 2004 मध्ये राजकारणात सक्रिय झाले. राजकारणात सक्रिय होताच 2004 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशा दोन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. एवढ्या प्रदीर्घ कालाच्या संघकार्य अनुभवानंतर ते राजकारणात आल्याने त्याची छाप त्यांच्या राजकीय वाटचालीत दिसून येत होती.