कोल्हापूर -कोल्हापुरातल्या ऐतिहासिक भुदरगडावर ( Discovery of Bhudargad Cave ) एका पुरातन गुहेचा शोध लागला आहे. गडावर स्वच्छता आणि संवर्धनाचे काम करत असताना काही दुर्ग संवर्धकांना ही मोठी पुरातन गुहा सापडली. येथील गडाच्या पश्चिम माचीची स्वच्छता करताना ही गुहा सापडली असून येथे येणाऱ्या पर्यटकांना आता ही गुहा सुद्धा पाहता येणार आहे. गुहा पूर्णपणे झाडा झुडुपांमध्ये लपली होती. त्यामुळे त्याच्या समोरची सर्व झुडपे काढून ही गुन्हा या मावळ्यांनी स्वच्छ केली. पहिल्यांदाच याठिकाणी अशा प्रकारे गुहेचा शोध लागल्याने दुर्ग प्रेमींसह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या गुहेला पुढील वाजूस दोन मार्ग आहेत आणि आत गुहेमध्ये गेल्यानंतर पुन्हा चार मार्ग दिसतात. बाहेरून लहान वाटत असलेली गुहा आतमध्ये खूप मोठी असल्याचे दिसून येते, अशी माहिती मावळा प्रतिष्ठानच्या ( Mawla Foundation ) मावळ्यांनी माहिती दिली.
मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच मोठ्या प्रमाणात गडकोट संवर्धनाचे काम सुरू असते. यांच्या संवर्धनाचे काम सुरू असताना आजपर्यंत अनेक तोफा सापडल्या आहेत. मात्र काल 1 ऑगस्ट रोजी याच मावळा प्रतिष्ठान मार्फत भुदरगड येथे स्वच्छता आणि पश्चिम माचीच्या बाजूला वाढलेली झाडे झुडपे काढण्याचे काम सुरू होते. तेंव्हा त्यांना एक भली मोठी गुहा नजरेस पडली.