कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत ( Karveer Nagri the capital of the Chhatrapati ) पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shrimant Shahu Maharaj Chhatrapati ) यांच्या हस्ते शमीपूजन पार पडले. यावेळी छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती आणि यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. दरम्यान, यावर्षीचा शाही दसरा महोत्सव ( Shahi Dussehra celebration ) भव्य स्वरुपात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
Shahi Dussehra celebration : कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा दिमाखात साजरा; पहा सजवलेले उंट, घोडे, चित्ररथ - Dussehra festival is celebrated
छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत ( Karveer Nagri the capital of the Chhatrapati ) पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा ( Shahi Dussehra celebration ) दिमाखात साजरा झाला. यावर्षीचा शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
असा पार पडला दसरा सोहळा :करवीर निवासिनी अंबाबाई श्री महालक्ष्मी, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीशाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने दिले. या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते मंत्री, मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, आदी विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.
भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष : यावर्षी सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसीचे विद्यार्थी उभे होते. नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.