1) आता रायगडच्या संवर्धनासाठी पोलंडचे तज्ञ प्रयत्न करणार
कोल्हापूर : आता दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी पोलंडचे तज्ञ (Polish experts for conservation of Durgaraj Raigad ) प्रयत्न करणार आहेत. पोलंड देशाचे राजदूत अडम बुराकोवस्की ( Ambassador Adam Burakowski ) यांच्यासह डॉ. बार्बरा क्रतिक यांच्या पोलंड मधील वास्तू व संवर्धन क्षेत्रातील तज्ञांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथील निवासस्थानी संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. ही तज्ञांची टीम भारतातील दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व बेंगलुरू विद्यापीठ सोबत संलग्न होती. यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने गुजरात व राजस्थान येथील पुरातन वाड्यांचे संवर्धन केलेले आहे. या भेटीवेळी दुर्गराज रायगड सह महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धन बाबत विस्तृत चर्चा झाली.
पोलंडच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड संवर्धनासाठी योगदान ?राजदूत अडम बुराकोवस्की यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्ञात आहे. ते याआधी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यास व दिल्ली येथे शिवजयंती महोत्सवास देखील उपस्थित राहिलेले आहेत. पोलंडच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून दुर्गराज रायगड संवर्धनात पोलंड देशाचे योगदान देण्यासाठी ते इच्छुक असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
2) भाडोत्री शिवसैनिक म्हणणाऱ्या खासदार मंडलिक यांच्याविरोधात बिंदू चौकात निदर्शने; म्हणाले..
कोल्हापूर :कोल्हापूरातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना खासदार बनवले तेच आता या शिवसैनिकांना भाडोत्री बोलत आहेत याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिवाय प्रतिज्ञापत्र दिलेले सर्वजणांची चौकशी झाली आहे. त्यामुळे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आशा भाडोत्री लोकांची गरज नाही. मात्र संजय मंडलिक यांनी कट्टर शिवसैनिकांना भाडोत्री बोलून त्यांच्या भावनेंचा अनादर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याच मंडलिक यांचा न भूतो न भविष्यती अशा मतांनी धूळ चारतील असेही यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी म्हंटले.
3) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावरील दाव्याच्या वादामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे यांना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांचे शिवसेना या नावास मान्यता देत तलवारढाल असे चिन्ह दिले आहे. मात्र ठाकरे गटा कडून आज कोल्हापुरात भर पाऊसात मशाल हतात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. ही क्रांतीची मशाल असून ही क्रांती म्हणजे आम्हाला धोका देणाऱ्याना नाश करणारे क्रांती असेल असे शिवसैनिक म्हणाले आहेत.
भर पाऊसात मशाली हातात घेत शक्तिप्रदर्शन: निवडणूक आयोगाने शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवत ठाकरे गटाला मशालीच चिन्ह दिला आहे तसेच शिवसेना हे नाव न वापरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आज कोल्हापुरात जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक शिवसैनिक युवासैनिक व महिला एकत्र येत भर पावसात मशाली हातात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठे शक्ती प्रदर्शन केले वरून पावसाच्या मोठ्या सरी बरसत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक धगधगती मशाल घेत उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणत शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देत होते. यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे,आसिफ अत्तार, मंजित माने, जोतिर्लिंग चौगुले,सचिन मांगले, स्मिता मांडरे,दीपाली शिंदे,दिनेश परमार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
ही मशाल प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना पराभूत करेल :यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव घेऊन आणि मशाल चिन्ह घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ही धगधगती मशाल आज आम्ही पेटवलेली आहे. ही मशाल हे क्रांतीची मशाल असून देशात अनेक क्रांती झाले आहेत मात्र ही क्रांती आम्हाला धोका देणाऱ्यांची नाश करणारी क्रांती आहे. ज्या पद्धतीने शिंदे गटानी मातोश्रीचा विश्वासघात केला त्यांचा हे मशाल प्रत्येक निवडणुकीत पराभूत करेल आणि याची सुरुवात अंधेरी पोटनिवडणुकीपासूनच होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच ढाल तलवारीवर मशाल हे भारी पडेल असे ते यावेळी म्हणाले आहेत.