कोल्हापूर -कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथककडे ( ATS ) सोपण्यात यावा असा आदेश ( Pansare murder investigation to ATS ) आज उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणाचा तपास करणार्या 'एसआयटी'च्या अधिकार्यांनीही 'एटीएस'ला तपासकार्यात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे ( Comrade Govind Pansare ) यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण झाली आहे. पानसरे हत्येचा तपास सीआयडीच्या विशेष तपास पथक करत आहे. मात्र, गेली सात वर्षात मारेकरी अद्यापही हाती लागलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात यावा. अशी, मागणी असणारी याचिका पानसरे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी एटीएसकडे तपास सोपविण्यास आमची हरकत नाही. असे, सीआयडीच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी काल सुनावणीवेळी स्पष्ट केले होते.
तपास एटीएसकडे वर्ग -यानंतर आज पानसरे कुटुंबीयांची मागणी मान्य करत न्यायालयाने तपास एटीएसकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथककडे ( Maharashtra Anti Terrorism Squad ) सोपण्यात यावा असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणाचा तपास करणार्या 'एसआयटी'च्या अधिकार्यांनीही 'एटीएस'ला तपासकार्यात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की एसआयटी कडून सुरू असलेला तपास हा एटीएसकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सुनावणी दरम्यान महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने हा तपास एटीएस कडे देण्यास काहीही हरकत नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने अशोक मुंदरर्गी यांनी केला आहे.
हेही वाचा -Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा