महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'इथे' रोज बसते माणुसकीच्या भावनेची पंगत, सेवा निलयंम संस्थेचा उपक्रम

कोरोनाने अनेक माऊलींच्या पोटचा घास हिरावून घेतला आहे. सर्व उद्योग धंद्यावर आर्थिक मंदीचे संकट ओढावले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना एक वेळेचे जेवण महाग होऊन बसले. इतक्या विदारक स्थितीत कोल्हापुरकरांनी माणुसकीच्या भावनेला साद घालत एकही माणूस उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेतली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात रेल्वे स्थानकावर भुकेल्या पोटाला एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. त्यावर ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट...

'इथे' रोज बसते माणुसकीच्या भावनेची पंगत, सेवा निलयंम संस्थेचा उपक्रम
'इथे' रोज बसते माणुसकीच्या भावनेची पंगत, सेवा निलयंम संस्थेचा उपक्रम

By

Published : May 1, 2021, 5:40 PM IST

कोल्हापूर- कोरोनाने अनेक माऊलींच्या पोटचा घास हिरावून घेतला आहे. सर्व उद्योग धंद्यावर आर्थिक मंदीचे संकट ओढावले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना एक वेळेचे जेवण महाग होऊन बसले. इतक्या विदारक स्थितीत कोल्हापुरकरांनी माणुसकीच्या भावनेला साद घालत एकही माणूस उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेतली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात रेल्वे स्थानकावर भुकेल्या पोटाला एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. त्यावर ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट...

'इथे' रोज बसते माणुसकीच्या भावनेची पंगत, सेवा निलयंम संस्थेचा उपक्रम
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात सुरुवातीला संचारबंदीची घोषणा केली. मात्र बधितांच्या वाढत्या संख्येमुळे अखेर जिल्हाबंदी करत कडक निर्बंध लावण्यात आले. याचा फटका छोट्या विक्रेत्यांना व फेरीवाल्यांना शिवाय परराज्यातील व्यावसायिकांना बसला आहे. हातावर पोट असणारे आपल्या गावी जाऊ न शकल्याने त्यांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात आधार घेतला आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सेवा निलयंम संस्थेने पुढाकर घेत अशा रस्त्यावर फिरणाऱ्या, प्रवाशांच्या पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २० दिवसांपासून हा उपक्रम न चुकता रेल्वेस्थानक परिसरात सुरू आहे. रोज २०० ते ३०० लोक आपली भूक भागवतात.दानशूरांचा सहभागातून दैनंदिन उपक्रमकडक निर्बंधाच्या काळात अनेकांचे वाढदिवस साजरे होत नाहीत. त्यातील बचत करुन थोडाफार हातभार या उपक्रमाला लावला जात आहे. अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे करत अन्न-धान्य, तेल, गहू, तांदूळ, ज्वारी, गॅस यासह पैशाच्या स्वरूपात मदत दिली आहे. नियमित मदत सुरू झाल्याने सेवा निलयंम संस्थेने हे काम अखंडितपणे गेले २० दिवस सुरू ठेवले आहे. जोपर्यंत निर्बंध आहे तोपर्यंत एकही व्यक्ती कोल्हापुरात उपाशी झोपणार नाही, असा निश्चय या संस्थेने केला आहे.'मानसिक समाधानासोबत सामाजिक कार्याचा आनंद'गेल्या वीस दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. यासाठी दिवसभर २० व्यक्ती कार्यरत असतात धान्य व्यवस्थित करण्यापासून ते जेवण वाढेपर्यंतच्या कामात अनेकजण सहभागी होतात. कोरोनामुळे लोकांचे काय हाल होत आहेत, हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मात्र त्यांना आधार देण्याचे काम व समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेने आम्ही काम करतो त्याचे समाधान आम्हाला मिळते अशी प्रतिक्रिया वैष्णवी मगदूम यांनी दिली आहे. या उपक्रमात रोज केदार मुनींश्वर, सौरभ कापडी, वैष्णवी मगदूम, राजकुवर घाटगे, स्मिता दिवसे, पौर्णिमा संकपाळ, ऐश्वर्या मुनींश्वर, राहुल गोंदिल सहभागी असतात.'कोरोनाने घास हिसकावला, पण माणुसकीने तो घास परत मिळाला'कडक निर्बंधामुळे आमचा रोजगार गेला, एकवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. अशा भुकेल्या पोटाला दोन घास रात्रीचे मिळतात याचाच आधार आम्हाला जास्त वाटतो. रोज याठिकाणी पोटभर जेवून मुलाबाळांना घेऊन जातो, अशी प्रतिक्रिया विजय जांभळे यांनी दिली आहे.गुजरातच्या फिरस्त्या कुटुंबाला ठरतोय हा उपक्रम आधारव्यावसाय निमित्ताने रजपूत कुटुंब कोल्हापुरात आले आहे. रस्त्यावर उभा राहून वस्तू विकण्याचा व्यवसाय ते करतात. मात्र राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यापासून ते रेल्वेस्थानकावर फुटपाथवर आपल्या दोन मुलांसोबत राहतात. कोरोनाने हातातील व्यवसाय काढून घेतल्याने मुलांचं पोट कसं भरायचे? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र कोल्हापूरकारांच्या माणुसकीने आमचं व आमच्या लेकरांचं पोट रात्री भरते, शिवाय सकाळी आणि दुपारी जेवणाचा डब्बा भरून घेतो, असे डबडबल्या डोळ्यांनी नीता रजपूत सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details