महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Heavy Rain In Kolhapur : स्थलांतरणासाठी तयार राहण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - District Collector of Kolhapur

पंचगंगा नदी ( Flood of Panchganga river ) कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी तात्काळ स्थलांतरणासाठी (ready for evacuation) तयार राहावे असे, निर्देश कोल्हापूचे जिल्ह्याधिकारी राहूल रेखवार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी दिले आहेत.

Heavy rains in Kolhapur
कोल्हापुरात मुसळधार पाऊस

By

Published : Jul 12, 2022, 3:39 PM IST

कोल्हापूर :कोल्हापूरात पावसाचा जोर वाढला ( Heavy rains in Kolhapur ) असून पंचगंगा नदी ( Flood of Panchganga river ) कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी तात्काळ स्थलांतरणासाठी (ready for evacuation) तयार राहावे असे निर्देश कोल्हापूचे जिल्ह्याधिकारी राहूल रेखवार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी दिले आहेत. गावकऱ्यांनी आवश्यक साहित्य सोबत घेण्याच्या सुचना देखील केली आहे. सध्या पाणीपातळी पंचगंगा नदीची ( Panchganga river Flood ) पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. जोरदार पावसाचा विचार करता काही तासांतच पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतरणासाठी तयार राहा आशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जनावरांचे तात्काळ स्थलांतर करा -पावसाचा जोर पाहता जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आत्ताच स्थलांतरित होण्याची तयारी करा अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. शिवाय जनावरांचे सुद्धा आत्ताच स्थलांतर करा आणि आवश्यक चाऱ्याची सुद्धा सोय करून ठेवा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं आणि गरोदर महिलांचे सुद्धा सुरक्षितस्थळी स्थलांतर करा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. सध्या 34 फुटांवर पाणीपातळी पोहोचली असून 39 फूट इशारा पातळी काही तासांमध्येच गाठण्याची शक्यता आहे. सध्या जवळपास 50 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक सुचनांकडे लक्ष द्या असेही त्यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा -

दरम्यान, कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने ( Municipal Corporation ) रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

दोन दिवस सलग पाऊस -दोन दिवसाच्या रिमझिम पावसामुळे अनेक भाविक बाहेर पडलेच नसल्याचे चित्र दिसत असून छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात ( Small Businesses In Financial Crisis ) सापडले आहेत. यापूर्वीच्या आषाढी एकादशीमध्ये छोटे व्यवसायिक 50 ते 60 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल करत असत. त्याच व्यवसायांची गेल्या तीन दिवसापासून केवळ चार ते पाच हजार रुपये सुद्धा आर्थिक उलाढाल झाली नसल्याचे सांगत आहेत. एकंदरीतच कोरोनाच्या महामारीनंतर मोठ्या आशेने आषाढी एकादशीची वाट पाहणाऱ्या व्यवसायिकांमध्ये गेल्या दोन दिवसांच्या पावसाने नाराजी पसरली आहे.

या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट -कमी दाबाच्या क्षेत्रात प्रभावामुळे येत्या 14 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा तसेच आज या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून 'आयएमडी'तर्फे या 2 विभागांना पुढील 5 दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा 'सेंटर फॉर सिटिझन सायन्स'च्या 'सतर्क' या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.

पावसाचा जोर कायम -नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवाधार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासांत नाशिकसह परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर (दि १०) रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान 7.7 मिलिमीटर पाऊस झाला. यानंतर रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान 6.4 मिलिमीटर पाऊस झाला. तर रात्री साडेअकरा ते पहाटे 35.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नागपुरात पावसाचा धुमाकूळ -नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ -जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( continuous rains in Nashik ) आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील ( water storage in Nashik dams ) पाणी साठ्यात वाढ होत आहे. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पालखेड धरणातून 15 हजार 408 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात ( ​​Palakhed Dam water release ) सुरू आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल असे, जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

चंद्रपुरात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा -भारतीय हवामान खाते ( Indian Meteorological Department ) यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली ( forecast torrential rains for Chandrapur ) आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी ( IMD alert for Chandrapur ) केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ( Chandrapur administration on IMD alert ) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - धरण क्षेत्रात पडणारा पाऊस ( Rain in Chandrapurs dams ) व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता दारे असणारे मोठ्या धरणाचे दारे केव्हाही उघडण्यात येऊ शकतात. दारे नसणारे धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातून पुराचे पाहणी वाहणार असल्याकारणाने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी.

गरिकांनी अशी घ्यावी काळजी - भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरणाबाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेवून सतर्क रहावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.


हेही वाचा -India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात

ABOUT THE AUTHOR

...view details