महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूरच्या गगनबावडामध्ये सर्वाधिक १४३.५० मीमी,तर शिरोळमध्ये १३.७१ मीमी सर्वात कमी पाऊस

कोल्हापूरात पूर परस्थिती गंभीर स्वरुपाची बनली आहे. शहर आणी परीसरात पाऊस सुरुच आहे. आज आखेर गगनबाबडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोेंद झाली आहे.

By

Published : Aug 4, 2019, 8:32 AM IST

कोल्हापूरच्या गगनबावडामध्ये सर्वाधिक १४३.५० मीमी,तर शिरोळमध्ये १३.७१ मीमी सर्वात कमी पाऊस

कोल्हापूर - जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १४३.५० मीमी, तर १३.७१ मीमी शिरोळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. सहा दिवसांपासून पावसाने कोल्हापूरात अक्षरशः धुमाकूळ घातल्याने सर्वच नद्यांना महापूर आला आहे. शनिवार पर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 24 तासांपासून झालेल्या पावसाची नोंद आणि एकूण पावसाची नोंद याची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी -

तालुके आकडेवारी एकूण
हातकणंगले 18.88 मिमी 476.67 मिमी
शिरोळ 13.71 मिमी 335.71 मिमी
पन्हाळा 82.43 मिमी 1240.14 मिमी
शाहूवाडी 65.67 मिमी 1628 मिमी
राधानगरी 104.17 मिमी 1584.67 मिमी
गगनबावडा 143.50 मिमी 3497 मिमी
करवीर 43.55 मिमी 979.82 मिमी
कागल 72.86 मिमी 979.57 मिमी
गडहिंग्लज 38 मिमी 638.71 मिमी
भुदरगड 79.80 मिमी 1259.40 मिमी
आजरा 100.50 मिमी 1571.25 मिमी
चंदगड 96.17मिमी 1548.33 मिमी

ABOUT THE AUTHOR

...view details