कोल्हापूर राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Former Rural Development Minister Hasan Mushrif यांनी 2 नवीन म्हशी खरेदी केल्या आहेत आणि त्याचे स्वागतसुद्धा त्यांनी स्वतः केले आहे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात Kolhapur Gokul Milk Sangh सध्या मुश्रीफ यांची सत्ता आहे आणि आठवड्यापूर्वीच माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादनवाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे आणि त्याची सुरुवात स्वत:पासूनच करण्याचे आवाहन केले होते आणि यामुळे स्वत नवीन दोन म्हशी घेत या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून केली आता आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा दहा म्हशी मुश्रीफांच्या गोठ्यात आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून Amul Milk Sangh Challenge to Gokul Dudh Sangh आणलेल्या या दोन म्हशीचे हसन मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत केले.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये सध्या महविकास आघाडीची सत्ता आहे. या सत्तेला आता तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले आणि आता दूध उत्पादन वाढवण्यासाठी म्हशी वाढवणे गरजेचे आहे म्हणत सर्व संचालक व कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना म्हशी घेण्याचे त्यांनी आवाहन केले होते याची सुरुवात म्हणून स्वतः दोन म्हशी खरेदी केल्या आहेत. या म्हशींच्या स्वागतालासुद्धा ते उपस्थित राहिले आहेत यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात येऊन एक वर्ष झाले संघाने एक वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आम्ही यापूर्वीच मांडलेला आहे मुंबई आणि पुण्यामध्ये २० लाख लिटर म्हशीच्या दुधाचे मार्केट उपलब्ध असल्याची आमची आता खात्री झालेली आहे अशातच अमूल दूध संघासारखे फार मोठे आव्हान गोकुळ दूध संघासमोर उभे आहे त्यामुळेच म्हशीचे दूध वाढविण्यामध्ये जर यशस्वी झालो तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल
अमूल दूध संघाचे गोकुळ दूध संघासमोर आव्हान अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत तिथे उत्पादित म्हशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव आहे अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभे राहू शकत नाही परंतु त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हशींचे दूध उत्पादनवाढ करावीच लागेल गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखांवर आहे त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.