महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माझ्याकडे पैसे आहेत की नाहीत याची चिंता चंद्रकांत पाटलांनी करू नये - हसन मुश्रीफ - चंद्रकांत पाटील

माझ्याकडे व्हाईट मनी आहे की नाही, याची चिंता चंद्रकांत पाटलांनी करू नये. गरज भासल्यास मी त्यांच्याकडून पैसे घेईन. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Hasan Mushrif
Hasan Mushrif

By

Published : Sep 13, 2021, 10:17 PM IST

Updated : Sep 13, 2021, 10:35 PM IST

कोल्हापूर - माझ्याकडे व्हाईट मनी आहे की नाही, याची चिंता चंद्रकांत पाटलांनी करू नये. गरज भासल्यास मी त्यांच्याकडून पैसे घेईन. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, किरीट सोमैया यांनी माझ्यावर आरोप केले. त्याची माहिती चंद्रकांत पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी दिली आहे. भाजपच्या अनेक कुरघोड्यांवर सडेतोड उत्तर देत असल्यानेच माझ्यावर हे कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. माझा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्याचे मुख्य सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा -माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
किरीट सोमैया यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा मुश्रीफ यांनी दिल्यानंतर पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला होता. 100 कोटींचा दावा ठोकण्यासाठी त्यावर स्टॅम्प ड्युटी किती भरावे लागते? याची माहिती मुश्रीफ यांना आहे का? असेल तर त्यांच्याकडे व्हाईट मनी तितका आहे का ? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्यावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्याची चिंता करू नये. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत. गरज लागल्यास आम्ही तुमच्याकडून घेऊ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

हे ही वाचा -मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा? २७०० पानांचे पुरावे सोमैय्यांनी दिले आयकर विभागाला

Last Updated : Sep 13, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details