महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sadavarte in Kolhapur Police custody : सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे, पोलीस सदावर्तेंना घेऊन कोर्टाकडे रवाना - गुणरत्न सदावर्ते कारवाई कोल्हापूर पोलीस

गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte in Kolhapur Police custody ) यांचा आता कोल्हापूर पोलिसांनी ताबा घेतला आहे. कोल्हापूर पोलिसांचे ( Gunaratna Sadavarte news kolhapur ) एक पथक काल मुंबईत दाखल झाले होते. रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडून कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांनी गुणरत्ने ( Gunaratna Sadavarte Kolhapur ) यांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. आज पोलीस त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. त्यांना घेऊन पोलीस न्यायालयाकडे रवाना झाली आहे.

Sadavarte in Kolhapur Police custody
गुणरत्न सदावर्ते ताबा कोल्हापूर पोलीस

By

Published : Apr 21, 2022, 10:40 AM IST

Updated : Apr 21, 2022, 12:29 PM IST

कोल्हापूर - गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte in Kolhapur Police custody ) यांचा आता कोल्हापूर पोलिसांनी ताबा घेतला आहे. कोल्हापूर पोलिसांचे एक पथक ( Gunaratna Sadavarte news kolhapur ) काल मुंबईत दाखल झाले होते. रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडून कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांनी ( Gunaratna Sadavarte custody Kolhapur ) गुणरत्ने यांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. मुंबईतील आर्थररोड कारागृहातून रात्री उशिरा त्यांना कोल्हापुरात आणण्यात आले. सदावर्ते यांना सोमवारी साताऱ्यातून मुंबईला नेण्यात आले होते. आता त्यांचा ताबा कोल्हापूर ( Gunaratna Sadavarte Kolhapur ) पोलिसांनी घेतला आहे. आज पोलीस त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. त्यांना घेऊन पोलीस न्यायालयाकडे रवाना झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

पोलीस सदावर्तेंना घेऊन कोर्टाकडे रवाना

हेही वाचा -Corona Free Kolhapur : दिलासादायक...! कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त; एकही नवा रुग्ण नाही

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार पोलीस त्यांना ताब्यात घेऊन तपास करत आहेत. एका आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना काल मुंबई येथे हलविण्यात आले.

न्यायालयीन कोठडीनंतर काल कोल्हापूर शाहूपुरी पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईला रवाना झाले होते. कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात गुणरत्नेंचा ताबा मिळावा यासाठी ते कोर्टात गेले होते. त्यानुसार कोर्टाने परवानगी दिल्यानंतर रात्री उशीरा त्यांना कोल्हापुरात आणण्यात आले. सदावर्ते यांच्या विरोधात सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांची तक्रार होती. त्यावरून गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करून समाजातील सलोखा बिघडवणे आदी त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. आज पुन्हा सदावर्ते यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे, त्यांचा कोल्हापुरातील मुक्काम वाढतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा -Hassan Mushrif Replied To Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही - हसन मुश्रीफ

Last Updated : Apr 21, 2022, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details