प्रोटोकॉल बाजूला सारून राज्यपाल चक्क व्यासपीठावर मांडी घालून बसले - Governor visits Kolhapur
अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्य श्री महाश्रमन यांचे कोल्हापूरात आगमन झाले. त्याच्या राज्यस्तरीय अभिनंदन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी उपस्थित होते. ते पोटोकॉल बाजूला ठेवत व्यासपीठावर मांडी घालून बसले.
कोल्हापूर - अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्यश्री महाश्रमन यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. आचार्यश्री महाश्रमन यांची देशव्यापी यात्रा सुरू आहे. तीन देश आणि 20 राज्यांमधून पदयात्रा करत ही यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली. यावेळी आचार्यश्री महाश्रमन यांच्या राज्यस्तरीय अभिनंदनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. यावेळी आचार्यश्री महाश्रमन यांच्याबद्दल आदर व्यक्त करत आणि सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून राज्यपाल चक्क व्यासपीठावर मांडी घालून बसले.