कोल्हापूर - एफआरपीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आक्रमक झाले आहेत. कारण राज्य सरकारने उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय कायम ठेवला असून एकरकमी एफआरपी देण्याची राजू शेट्टी यांची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आहे. (Government rejects demand for one-time FRP) त्यावर स्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडी सरकारला भोगावे लागतील. राज्य सरकारविरूध्द आरपारची लढाई लढणार असून याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कारखानदारांना एकरकमी एफआरपी द्यायला भाग पाडणार
यासंदर्भात शेट्टी यांनी पत्रव्यवहार करून उसाची एफआरपी एकरकमी देण्याची मागणी केली होती. यावर सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी उसाची एफआरपी एकरकमी देता येणार नसल्याचे राजू शेट्टी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.(Raju Shetty in preparation for the movement) त्यामुळे आता पुन्हा एकदा शेट्टी आक्रमक झाले असून, कारखानदारांना एकरकमी एफआरपी द्यायला भाग पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शेट्टींना सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांचे पत्र
उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने विश्वासघातकीपणे घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या अन्नात माती कालवणारा हा निर्णय आहे. त्यावर पुर्नविचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांना पत्रव्यवहार करून राज्य सरकारने अधिकार नसताना एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये उसाची एफआरपी एकरकमी देण्याची मागणी केली होती.
एफआरपी दोन टप्प्यातच दिली जाणार