महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी सज्ज रहावे - दौलत देसाई - Meeting with pediatricians via videoconferencing

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी सज्ज रहावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांसोबत व्हिडिओकॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Government and private hospitals should be ready to deal with the third wave, the district collector said
तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी सज्ज रहावे - दौलत देसाई

By

Published : May 26, 2021, 5:14 PM IST

कोल्हापूर - तिसरी लाट येईल का? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत. मात्र, आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी सज्ज रहावे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांनी फॅसिलिटी ॲप दैनंदिन मेन्टेन (अद्ययावत) करावा. याबाबत हलगर्जीपण करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांसोबत व्हिडिओकॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

संबंधित रूग्णांलयानी मायक्रोप्लॅनिंग करावे - जिल्हाधिकारी

या बैठकीवेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सीजन पुरेसा साठा आहे. जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ रुग्णालये तसेच याकामी ज्या रुग्णालयाची सेवा घेण्यात येणार आहे. त्या रुग्णालयांनी प्रत्येकी 10 लिटरचे 5 ते 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर घेवून ठेवावेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही. भविष्यातील संभाव्य स्थिती लक्षात घेवून केवळ बालरोग तज्ज्ञांनीच व इतर रूग्णालयांनीही कोविड बाल रूग्ण उपचार देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे. यासाठी प्राधान्य देण्यात यावे. याबाबत संबंधित रूग्णांलयानी मायक्रोप्लॅनिंग करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यात 1 हजार बेडची तयारी करावी लागेल - डॉ. साळी

या बैठकीत आपले मत व्यक्त करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, की जिल्ह्यात किमान 1 हजार बेडची तयारी करावी लागेल. त्याचबरोबर साध्या आणि ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी लागेल. त्याचबरोबर तालुकानिहाय बेडची उपलब्धता करावी लागेल, असे मत सुद्धा साळी यांनी व्यक्त केले. आयसोलेशन, होम केअर करताना रूग्णांची अतिशय काळजी घ्यावी लागेल. या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सुमारे 190 च्या आसपास आयसीयू बेड लागतील. सध्या जिल्ह्यातील ओटू बेडचा आपण आढावा घेतला असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्हीसीव्दारे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details