कोल्हापूर - मराठा समाजानंतर आता धनगर समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे.. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबरला कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होणार आहे. आंदोलनाची व लढ्याची पुढील दिशा या परिषदेत ठरवली जाणार असून, राज्यातील निमंत्रक आमदार, माजी खासदार याला उपस्थित राहणार आहे.
धनगर आरक्षण लढ्याची दिशा ठरणार कोल्हापुरात, २ ऑक्टोबरला गोलमेज परिषद - गोलमेज परिषद बातमी
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबरला कोल्हापुरात गोलमेज परिषद होणार आहे. आंदोलनाची व लढ्याची पुढील दिशा या परिषदेत ठरवली जाणार आहे.
कोल्हापुरातील दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोलमेज परिषदेला सुरुवात होणार आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीच्यावतीने या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील धनगर समाजाचे नेते गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याचे गोलमेज परिषदेचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी सांगितले आहे. 'धनगर सारे एक' हे ब्रीदवाक्य घेऊन गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.