कोल्हापूर - एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या व्यथा पाहून अस्वस्थ झालेला असताना ज्यांच्यावर दुखीतांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी आहेत, ते मंत्री महोदय मात्र पूर पाहणी करताना पर्यटनाचा आनंद घेत आहेत की काय, असा व्हिडीओ समोर आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पूरपाहणी दौऱ्या दरम्यानचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.
सांगली, कोल्हापूर भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या सहकाऱ्यांसोबत दौऱ्यावर असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे पर्यटनाचे भाव पाहून हे राज्याचे पालन कर्ते आहेत की जनतेच्या जखमेवर मिट चोळणारे, अशीच भावना नागरिकांच्या मनात येत आहे.