महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Train Derailed In Kolhapur : कोल्हापुरात मालगाडीचा डबा घसरला ; 6 जण जखमी

कोल्हापुरात आज (सोमवार) सकाळी मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा एक डबा रुळावरून ( freight train derailed In Kolhapur ) घडल्याची दुसरी घटना घडली आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Train Derailed In Kolhapur
कोल्हापुरात मालगाडीचा डबा घसरला

By

Published : Dec 6, 2021, 4:07 PM IST

Updated : Dec 6, 2021, 4:38 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात काल रात्री उशीरा रेल्वेच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली असताना लगेचच आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा एक डबा रुळावरून ( freight train derailed In Kolhapur ) घडल्याची दुसरी घटना घडली आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस दाखल झाले असून घडलेल्या घटनेची चौकशी करत आहेत.

कोल्हापुरात मालगाडीचा डबा घसरला ; 6 जण जखमी

सिमेंटची पोती काढण्याचे सुरू होते काम -

कोल्हापूर येथील मार्केट यार्ड मध्ये काल रात्री सिमेंटची वाहतूक करणारी रेल्वे दाखल झाली होती. दररोज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिमेंट च्या पोत्यांची आवक होत असते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या रेल्वेमधील सिमेंट उतरण्याचे काम सुरू होते. इतक्यात रेल्वेच्या रुळावरून एक बडा घसरला. यामध्ये सहा जण जखमी झाले. त्यांना तात्काळ बाहेर काढून येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणा आणि माथाडी कामगार यांच्यासह नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती.

सहा जण गंभीर जखमी -

या गंभीर अपघातात सुरेश साधू गडे, शिराज शब्बीर आदल खान, पांडू गेंड, सनीउल्ला शेख, सादिक शब्बीर शेख, मुजाहिदीन मुजावर हे कामगार जखमी झाले आहेत. यापैकी चौघांची प्रकृती काही प्रमाणात चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल असून घटनेची माहिती घेत आहेत.

हेही वाचा -Mahaparinirvan Day 2021 : प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी घरूनच केले बाबासाहेबांना अभिवादन

Last Updated : Dec 6, 2021, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details