कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयातील ( Chhatrapati Pramilaraj Government Hospital ) शवविच्छेदन विभागातील ( Autopsy Department ) फ्रिजर बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे फ्रिजर बंद असल्याने एक मृतदेह सडल्याची धक्कादायक बाबसुद्धा समोर आली आहे. याच सडलेल्या मृतदेहावर कोल्हापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ( social worker in Kolhapur ) अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून येथील फ्रिजर बंद असल्याचे समजले असून, याबाबत तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
वारंवार निदर्शनास आणले मात्र त्याकडे दुर्लक्ष : दरम्यान, कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात सीपीआरकडे पाहिले जाते. मात्र, या रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील फ्रिजरच गेल्या 6 दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. परिणामी एक मृतदेह अक्षरशः सडल्याचे सामोरे आले असून, त्या मृतदेहावर एका सामाजिक कार्यकर्त्याकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.