कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराजांची नगरी असलेल्या कोल्हापुरात त्यांची शिकवण आणि आठवण नेहमी येथील नागरिकांमधून आपल्याला पाहायला मिळत असते. कोल्हापूरकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपले संरक्षण करणाऱ्या जवानांना सेवा देत कृतज्ञता व्यक्त करत असतो. कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प परिसरात राहणाऱ्या योगिराज माटे ( Yogiraj Mate Salon in Kolhapur ) हे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची पूर्णपणे मोफत दाढी व केस कापून एकप्रकारची देश सेवा करत आहेत.
पुलवामा हल्लानंतर सुचली कल्पना
कदमवाडी येथील बापट कॅम्प परिसरात राहणाऱ्या अतुल माटे व त्यांचा मुलगा योगिराज माटे हे गेल्या 16 वर्षापासून जाधववाडी येथे मल्हार जेंट्स पार्लर ( Jadhavwadi Malhar Gents parlor ) नावाने दुकान चालवितात. या दुकानात केस कापणे, दाढी करणे व मसाज करणे अशा विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. अतुल माटे यांचे आजोबा बळवंत माटे हे सैन्यदलात होते. निवृत्तीनंतर त्यांनी मुंबई येथे सलून दुकान चालू केले. मात्र, त्यानंतर काही वर्षांनी ते सर्व कोल्हापूरला स्थायिक झाले. त्यानंतर सैन्यदलात जाण्यासाठी त्यांच्यातील कोणीच प्रयत्न केला नाही. परंतु सैन्यदलात न जाता रक्तदान करून किंवा अशा विविध मार्गातून देशसेवा करण्याचे काम परिवाराकडून सुरू होते.
जवानांची सेवा करणे म्हणजे हीच देश सेवा हेही वाचा-Goa Election 2022 : उत्पल पर्रीकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बाबूश मोन्सेरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जवान सुट्टीला आल्यानंतर मोफत दाढी व कटिंग
गेल्या काही वर्षांपुर्वी काश्मीर येथे पुलवामा हल्ला झाला. त्यात अनेक जवान शहीद झाले. तेव्हा संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. कोल्हापुरातदेखील जाधववाडी येथे एक कँडलमार्च काढण्यात आला. त्यावेळी जवानांच्या सेवेसाठी आपण काही तरी करावे, या विचाराने योगीराज माटे ( Yogiraj Mate hair cut service for soldier ) यांनी जवानांसाठी मोफत सेवा सुरू केली. गेल्या 3 वर्षांपासून दुकानात येणाऱ्या निवृत्त जवान आणि त्यांच्या परिवारातील व्यक्तीला पन्नास टक्के सवलत देऊन दाढी व कटिग करत आहे. सीमेवर तैनात असलेला जवान सुट्टीला आल्यानंतर मोफत दाढी व कटिंग करतात. शहीद झालेल्या जवानांच्या परिवारातील सदस्यांचेदेखील मोफत दाढी व कटिग करून सेवा देत आहेत. सीमेवर जाऊन देश सेवा करता आली नाही, तरी सीमेवर असलेल्या त्या जवानांची सेवा करणे म्हणजे हीच देश सेवा असे ते म्हणतात.
हेही वाचा-Anil Avchat Passed Away : सुप्रसिद्ध लेखक डॉ.अनिल अवचट यांचे निधन; विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
निवृत्त जवानांकडून उपक्रमाचे कौतुक
आजूबाजूच्या परिसरातील निवृत्त जवान आणि त्यांच्या परिवारातील सदस्य येथे येतात. जवान नाना शिंदे यांनी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच समाधानदेखील व्यक्त केले आहे. येथे आलेला प्रत्येक जवान हा माटे कुटुंबियांच्या सेवेने नेहमीच आनंदी असतो, असेदेखील त्यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे आणखी उपक्रम जिल्ह्यात अजून काही नागरिकांनी चालू करावेत, अशी इच्छादेखील व्यक्त केली आहे.
हेही वाचा-Supreme Court On Nitesh Rane : नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी