कोल्हापूर - कोल्हापूर वनविभागासह (Kolhapur Forest Department) नाशिक आणि इतर वनविभागाने संयुक्तपणे नाशिक येथे मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील लक्ष्मी पूजा साहित्य भांडारवर (Laxmi Puja Sahitya Bhandar) वनविभागाने ही कारवाई केली आहे. नुकतेच कोल्हापूरातील बावडेकर दुकानावर छापा टाकून कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये इंद्राजाल आणि इतर घटक आढळले होते. त्या अनुषंगाने तपास केला असता नाशिक येथेसुद्धा लक्ष्मी पूजा साहित्य भांडार येथे अवैद्य वस्तू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनवण्यात आलेल्या एसआयटी पथकाने छापा टाकून इंद्राजाल (ब्लॅक कोरल), हत्ता जोडी (घोरपडचे गुप्तांग), साळींदरचे काटे, रानडुक्कर दात तसेच इतर काही वन्यजीव अवयव हे विक्रीसाठी साठा केला असल्याचे सापडले आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार :
दरम्यान, मिळालेल्या महितीनुसार, ऑक्टोबर 2021 महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात झालेल्या विविध पूजा साहित्य भांडार तसेच औषधी दुकानांवर झालेल्या कारवाईमध्ये, इंद्रजाल (ब्लॅक कोरल), रेड सी फॅन, हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्तांग) हे मोट्या प्रमाणावर सापडले होते. कोल्हापुरातील बावडेकर, हंजे, अशा विविध दुकानात वन्यजीव प्रतिबंधीत माल सापडला होता. त्याच्या अनुषंगाने पुढे चौकशी केली असता, आज सोमवारी सकाळी नाशिक येथील लक्ष्मी पूजा भांडार येथे कोल्हापूर वनविभागाने छापा टाकून संशयित आरोपी कैलास बबन कुलथे याला अटक केली आहे. पंचनामा झाल्यानंतर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- भांडारात या वस्तू सापडल्या :