महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यंदाही गणेश मूर्तिकारांना महापुराचा फटका; पुन्हा मूर्ती तयार करण्यासाठी घेतायेत मेहनत - floods

कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प आणि शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मूर्तिकार आहेत. मात्र, 2019 नंतर यावर्षी सुद्धा या दोन्ही भागातील शेकडो मूर्तिकारांच्या घरांसह शेडमध्ये पाणी शिरल्याने हजारो मूर्ती खराब झाल्या आहेत.

kolhapur
मूर्ती तयार करण्यासाठी घेतायेत मेहनत

By

Published : Aug 22, 2021, 4:30 PM IST

कोल्हापूर - 2019 नंतर यावर्षी सुद्धा कोल्हापूरातील मूर्तिकारांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सवाला काही दिवसच बाकी असताना कोल्हापूरला महापुराचा फटका बसला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मूर्तिकारांच्या अनेक मुर्त्या खराब झाल्या आहेत. सद्या गणेशोत्सवाला अवघे 15 ते 20 दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच मूर्तिकार अनेकांच्या घेतकेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट...

मूर्तिकारांना महापुराचा फटका

बापट कॅम्प आणि कुंभार गल्ली येथील मूर्तिकारांचे नुकसान
कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प आणि शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मूर्तिकार आहेत. मात्र, 2019 नंतर यावर्षी सुद्धा या दोन्ही भागातील शेकडो मूर्तिकारांच्या घरांसह शेडमध्ये पाणी शिरल्याने हजारो मूर्ती खराब झाल्या आहेत. अनेक मूर्ती तर तयार सुद्धा झाल्या होत्या. पावसाचा जोर जसा जसा वाढू लागला त्यानंतर इथल्या व्यावसायिकांनी गणेश मूर्ती सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. काहींनी येथील मार्केट यार्ड परिसरात मूर्ती हलविल्या. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी पाणी पातळी वाढत गेल्याने शेवटी अनेक मूर्ती तशाच ठेऊन मूर्तिकारांना आपल्या घराबाहेर पडावे लागले. यामध्ये अनेकांचे प्रापंचिक साहित्य खराब झालेच आहे. शिवाय मोठ्या मेहनतीने बनविलेल्या मूर्तीसुद्धा खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

संपूर्ण कुटुंब कामात व्यस्त
मूर्ती पाण्याखाली गेल्याने झाल्या खराब
महापुरामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी तब्बल 3 ते 4 महिने आधी येऊन गणेशमूर्ती ठरवून मूर्तिकारांना आगाऊ रक्कम दिली होती. मात्र, ठरवलेल्या मूर्ती सुद्धा पाण्याखाली गेल्याने संबंधित मंडळांसह व्यापाऱ्यांना पुन्हा तशाच मूर्ती बनवून देण्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. अनेकांनी तर आपापल्या पाहुण्यांचीही मदत घेत आहे. त्यामुळे सर्व परिवार मूर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत.
खराब झाल्या गणेशमूर्ती
गणेशोत्सवाला अवघे 15 ते 20 दिवस बाकी
अनेक मूर्तिकारांनी ऑर्डर स्वीकारून मूर्ती बनवल्या होत्या. काही मूर्तीचे रंगकाम सुद्धा झाले होते. मात्र महापुराने मूर्ती खराब झाल्या असून पुन्हा ऑर्डर च्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत. यामुळे सर्वच मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसला असून वेळ तसेच पैसे सुद्धा खर्च होणार आहेत. अनेकजण तर कर्ज काढून सुरुवातीला पैसे मूर्ती बनवत असतात आणि गणेशमूर्ती विक्री झाल्यानंतर ही कर्ज भागवत असतात. मात्र आता त्यांच्यासमोर पुन्हा एकदा कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सुद्धा मूर्तिकारांना मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
मूर्तीकार आर्थिक तोट्यात

हेही वाचा -अफगाणिस्तान : भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन मायदेशी परतले

ABOUT THE AUTHOR

...view details