कोल्हापूर - 2019 मध्ये ज्या दोन गावांना महाप्रलयाचा फटका बसला. त्याच आंबेवाडी आणि चिखली गावाला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसला आहे. 2019 मध्येही अनेक मंत्री, नेते गावात येऊन नागरिकांना आश्वासन देऊन गेले. अनेकांना मदत मिळाली तर काहींना मिळाली नाही. त्यामुळे यावेळी गावात महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांच्या शब्दांचा मार सोसावा लागला.
अन् चिखली गावातल्या पुरग्रस्ताने फडणवीस, चंद्रकांत पाटलांना सुनावले पुरग्रस्ताने तीव्र शब्दात व्यक्त केल्या भावना..
अनेक नेते येतात आश्वासन देऊन जातात. नंतर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आणि आम्ही आमच्या कामात, पूढे काहीच होत नाही, असे इथल्या पुरग्रस्तांने फडणवीस यांना सुनावले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये या गावाला भेट दिली होती. ज्या मंदिरात नागरिकांशी चर्चा करून आश्वासन दिले होते. त्याच मंदिरात यावेळी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नेते आले आणि त्यांच्याशी संवाद साधू लागले. त्यापूर्वीच एका पुरग्रस्तांने आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून यापुढे असे करू नका, आमच्याकडे लक्ष द्या अशी विनंती केली.
हेही वाचा- जम्मू काश्मीर : पुलवामाच्या हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी एन्काउन्टरमध्ये ठार