कोल्हापूर - पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुंठ्याला 135 रुपयेप्रमाणे मदत जाहीर केल्यानंतर आता शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. शिवाय राज्य सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना 135 रूपये प्रमाणे मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचेही या शेतकऱ्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असे म्हंटले आहे.
- सरकारविरोधात शेतकरी आक्रमक; भीक नको मदत द्या :
सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवर आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुरुंदवाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे त्यांनी दहन करत आपला रोष व्यक्त केला आहे. महापुरासह अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना सरकारने 2019 प्रमाणे मदत करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असेही या शेतकऱ्यांनी म्हंटले आहे. आम्हाला भीक नको मदत द्या असे म्हणत सरकार विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
- मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द फिरवला :